‘हिंदी येत नाही म्हंटल्यावर ‘त्या’ अधिकार्‍यानं मला विचारलं तुम्ही भारतीय आहात का ?’

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाइन – द्रविड मुन्नेत्र कळघमच्या खासदार कनिमोळी यांनी मला हिंदी येत नाही असे सांगितल्यावर विमानतळावरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने त्यांना, ‘तुम्ही भारतीय आहेत का?’ असा प्रश्न विचारल्याचा आरोप केला आहे. ट्विट करुन या प्रकरणाची माहिती कनिमोळी यांनी दिली.

कनिमोळी यांनी सांगितल्यानुसार, दिल्लीला जाण्यासाठी त्या चेन्नई विमानतळावर पोहचल्यावर चौकशी करण्यात येत होती. तेव्हा मी जे विचारायचे ते तामिळ किंवा इंग्रजीतून विचारा मला हिंदी येत नाही, असे म्हटलं तर अधिकाऱ्याने थेट तुम्ही भारतीय आहात का असा प्रश्न विचारला. ‘भारतीय म्हणजे हिंदी असे समीकरण कधीपासून सुरु झाले, याची मला माहिती हवी आहे’ असे कनिमोळी यांनी hindiimposition या हॅशटॅगच्या माध्यमातून ट्विट केले. दरम्यान, या घटनेनंतर ‘सीआयएसएफ’ने ट्विट घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचं म्हटलं.

एखादी भाषा आपणास बोलता येत नसेल अथवा एखाद्या धर्माचे नसल्यानं आपल्या भारतीय नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. भाषा येत नसेल किंवा विशिष्ट धर्माची नसेल तर भारतीयत्व कमी होत नाही. देशाचं मोठेपण विविधतेमध्ये आणि सर्वसमावेशकतेत आहे. आपण नेमकी हीच गोष्ट विसरुन चाललो आहोत अशी भावना कनिमोळी यांनी व्यक्त केली.

दरम्यान, या प्रकरणानंतर सीआयएसएफनं चौकशीचे आदेश दिले आहेत. सीआयएसएफने ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, एखादी भाषा बोलण्यासाठी किंवा व्यवहारासाठी वापरली जावी त्यासाठी आग्रह करणे हे सीआयएसएफच्या धोरणात बसत नाही. तर सीआयएसएफनं विमानतळावर झालेल्या प्रकारानंतर करण्यात येणाऱ्या चौकशीच्या निर्णयाबाबत कनिमोळी यांनी त्यांचे आभार मानले.