बँकिंग क्षेत्राच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक ! ‘या’ बँकेनं एकाला चुकून ट्रान्सफर केले 3650 कोटी ! पुढं झालं ‘असं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सिटी बँकेबाबत एक बातमी समोर आली आहे. सिटी बँकेकडून एक मोठी चूक झाली आहे. बँकिंग क्षेत्राच्या इतिहासातील ही सर्वात मोठी चूक असल्याचं बोललं जात आहे. कॉस्मेटीक कंपनी रेवलॉन संबंधित ही बातमी आहे. बँकेला या कंपनीमुळं 50 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 3650 कोटी रुपये एवढं नुकसान झालं आहे.

एका इंग्रजी रिपोर्टनुसार, कॉस्मेटीक कंपनी रेवलॉनला सिटी बँकैनं चुकून 3650 कोटींची रक्कम ट्रान्सफर केली आहे. एका अधिकाऱ्याकडून चूक झाली आहे. बँकेला ही रक्कम अद्याप परत घेता आलेली नाही. कंपनी देखील चुकून ट्रान्सफर झालेले पैसे परत द्यायला तयार नाही असं समजत आहे. त्यामुळं आता हे प्रकरण अमेरिकेतील कोर्टापर्यंत गेलं आहे. सिटी बँकेच्या या चुकीला बँकिंग क्षेत्राच्या इतिहासातील सर्वात मोठी चूक असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.

कशी झाली चूक ?
2016 मधील हे प्रकरण आहे. जेव्हा सिटी बँकेनं कॉस्मेटीक कंपनी रेवलॉनला 1.8 मिलियन डॉलर कर्ज दिलं होतं. कंपनीच्या बाँडच्या आधारे हे कर्ज वितरीत करण्यात आलं होतं. परंतु बँकेच्या तांत्रिक चुकीमुळं 500 मिलियन डॉलर रक्कम कंपनीच्या खात्यात चुकीनं ट्रान्सफर झाली. बँकेच्या मते सॉफ्टवेअर मधील तांत्रिक बिघाडामुळं ही रक्कम चुकून ट्रान्सफर झाली. कंपनीनं मात्र ही रक्कम बँकेला परत देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी आता अमेरिकेच्या कोर्टात खटला सुरू आहे.

काय म्हणालं कोर्ट ?
हे प्रकरण जवळपास 4 वर्षांपासून कोर्टात सुरू आहे. अमेरिकन कोर्टानं स्पष्ट सांगितलंय की, बँकिंग क्षेत्राच्या इतिहासातील ही सर्वात मोठी चूक आहे. म्हणजे सिटी बँकेला स्वत:ची चूक मान्य करून नुकसान भरपाई द्यावी लागेल. त्यामुळं 3650 कोटींपासून बँकेला वंचित रहावं लागेल. याआधीही बँकेबद्दल अशी अनेक प्रकरणं समोर आली आहे. परंतु ही सर्वात मोठी घटना आहे.

कोर्टांच्या निर्णयाशी बँक असहमत
एका रिपोर्टनुसार, सिटी बँकेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, आम्ही कोर्टाच्या निर्णयाशी असहमत आहोत. ही रक्कम चुकीनं ट्रान्सफर झाली आहे. ती परत मिळवण्यासाठी बँक प्रयत्न करत आहे. तर कंपनीनं 1991 मध्ये झालेल्या एका खटल्याचा आधार घेत म्हटलं आहे की, जर बँकेनं चुकीनं एखाद्याच्या खात्यावर पैसै ट्रान्सपर केले तर ती बँकेची जबाबदारी आहे. ती ज्याच्या खात्यावर पैसे जमा झाले त्याची जबाबदारी नाही.