‘बेवफाई’ची राजधानी बनलंय IT ‘हब’ बेंगळुरू, ‘प्रेम’ संबंधातून सर्वाधिक ‘मर्डर’

बेंगळुरु : वृत्त संस्था – देशातील बेंगळुरू शहर आयटी सीटी आणि त्याच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु आता याची नवी ओळख समोर आली आहे. आता ते प्रेम, सेक्स आणि धोका याची राजधानी होत आहे. मागील काही कालावधीपासून बेंगळुरूमध्ये प्रेमाच्या नावावर धोका, विश्वासघात आणि नंतर मर्डर सारखे अंगाचा थरकाप उडवविणारे प्रकार समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वीच एका एक्स्ट्रा मॅरिटल वेबसाईटबाबत काही धक्कादायक खुलासे करण्यात आले, जे विचार करण्यास भाग पाडत आहेत.

अलिकडच्या काळात शहरात अशी सर्वाधिक प्रकरणे उघड झाली आहेत ज्यामध्ये पतीने पत्नीचा आणि पत्नीने पतीचा खून केला किंवा त्रास दिला आहे. एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरमध्ये अडचण होत असल्याने दोघांपैकी एकाने असे भयंकर पाऊल उचलल्याचे दिसून आले आहे.

एक्स्ट्रा मॅरिटल वेबसाइटवर बेंगळुरूचे 1.35 लाख लोक रजिस्टर्ड

वेबसाइट Gleeden च्या माहितीनुसार त्यांचे बेंगळुरूमध्ये 1.35 लाख रजिस्टर्ड यूजर्स आहेत, जे देशातील कोणत्याही शहराच्या तुलनेत सर्वात जास्त आहेत. अशा प्रकारे बंगळुरू शहर विश्वासघाताची राजधानी म्हणून समोर आले आहे. या यूजर्समध्ये 43,200 महिला आहेत, ज्या विवाहबाह्य स्वातंत्र्य आणि excitement च्या शोधात आहेत. यामध्ये 91,800 रजिस्टर्ड पुरुष यूजर्स आहेत.

कर्नाटक, दिल्ली आणि तामिळनाडुमध्ये प्रेमामुळे मर्डर

नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्यूरोच्या आकड्यांमधून खुलासा झाला आहे की, प्रेमसंबंध हत्येचे सर्वात मोठे आणि मुख्य कारण आहे. कर्नाटक, दिल्ली आणि तमिळनाडुमध्ये 2001 आणि 2017 च्या दरम्यान लव-अफेयर्स मर्डरचे दुसरे सर्वात मोठे कारण होते.

बेंगळुरुमध्ये पोलिसांद्वारे संचालित हेल्पलाइन वनिता सहाय वाणीमध्ये एका आठवड्याच्या आत सुमारे 40 तक्रारी अशा प्राप्त होतात, ज्या अफेयर्स आणि त्यामुळे वैवाहिक जीवनाचे होणारे नुकसान याबाबत असतात.

पोलीस कमिश्नर भास्कर राव यांनी मान्य केले की, सर्वाधिक भीषण हत्या, हल्ले, अपहरण इत्यादी गुन्हे हे गुप्त प्रेमसंबंधाच्या कारणामुळे केले जातात. त्यांच्या मतानुसार दिवसेंदिवस अशा प्रकारची प्रकरणे भयंकर रूप घेत आहेत. ही एक भयंकर प्रवृत्ती आहे आणि तिला थांबवणे गरजेचे आहे.

सिटी क्राईम रेकॉर्ड ब्यूरोने सुद्धा स्पष्ट केले आहे की, बहुतांश पती किंवा पत्नीद्वारे आपल्या धोकेबाज पार्टनरला संपवण्यासाठी हत्या केली जाते. एवढेच नव्हे तर यामध्ये मुलांचाही बळी घेतला जातो.

मोबाईल डेटींग अ‍ॅप, पार्टनरशी संवादाचा अभाव हे एक्स्ट्रा मॅरिटलचे कारण

फॅमिली अ‍ॅण्ड मॅरिटल कौन्सिलर अश्विनी ए यांनी सांगितले की, प्रेम एक killer आहे. नात्यात धोका जाणवल्यानंतर व्यक्तीला सावरणे अवघड होऊन बसते. काही लोक भयंकर संताप आणि नाराजीत काहीही कृत्य करतात.

त्यांचे म्हणणे आहे की, मोबाइल डेटींग अ‍ॅप, उदासिनता, पार्टनरसोबत संवादाचा अभाव, अस्वीकृतीची भिती यासारख्या गोष्टी एक्ट्रा मॅरिटल अफेयरचे कारण ठरत आहेत. यासाठी कपल्सने एकमेकांसाठी अधिक वेळ दिला पाहिजे. गॅझेट्सचा वापर कमी केला पाहिजे. यासोबतच नैतिक आणि सामाजिक सीमांचे बंधन पाळले पाहिजे.