धुळे : कमलाबाई चौकात तरूणीची छेड काढणार्‍या रोडरोमिओला नागरिकांकडून चोप

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे शाळा, कॉलेज बंद होते. दोन दिवसांपासून शाळा, कॉलेज आवार गजबजायला लागले. याचाच फायदा रोडरोमिओ घेत आहे. या रोडरोमिओंच्या त्रासामुळे काही विद्यार्थांनी भिती पोटी शाळा, कॉलेजची वाटच धरत नाही. शहरातील कमलाबाई, जिजामाता, जयहिंद कॉलेज, एसएसव्हीपीएस कॉलेज परिसरात रोडरोमिओचा उच्छाद सुरुच असतो.

रोडरोमिओने शनिवारी सकाळी कमलाबाई चौकात शाळेत येणाऱ्या एका मुलीची छेड काढली. यावेळी मुलीने आरडाओरड केला. हा प्रकार काही अतंरावर उभ्या असलेल्या नागरीकांनी व नातेवाईकांनी बघितला. काही नागरीकांनी रोडरोमिओला पळताना पकडून त्याला चांगला चोप दिला. त्यानंतर नागरिकांच्या तावडीतून सुटून त्याने तेथून पळ काढला.

शहरात दामिनी पथक हे मुख्य शाळा चौकात बंदोबस्तासाठी व रोडरोमिओवर कारवाईसाठी तैनात असते. परंतु या घटनेवेळी दामिनी पथक हजर नव्हते.

Visit : Policenama.com