नीरा व परिसरातील नागरिकांनी क्षयरोग व कुष्ठरोग रुग्णांच्या शोध मोहिमेस सहकार्य करावे : डॉ. धारूरकर

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्यातील नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील कुुटूूंबांंतील क्षयरोग व कुष्ठरोग रुग्णांच्या शोध मोहिमेच्या संयुक्त सर्वेक्षणास १ डिसेंबर पासून सुरुवात झाली असून ३० डिसेंबर २०२० पर्यंत ही मोहिम सुरू राहणार आहे. या मोहिमेस नीरा व परिसरातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य धारूरकर यांनी सांगितले.

राज्य शासनाने समाजातील क्षयरुग्ण व कुष्ठरूग्णांचा शोध घेण्यासाठी संयुक्त अभियान राबविले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील नीरा-शिवतक्रार, गुळूंचे, कर्नलवाडी, पिंपरेखुर्द, मांडकी या गावातील क्षयरुग्ण व कुष्ठरूग्णांचा शोध घेण्यासाठी संपुर्ण कुटुंबांंच्या घरोघरी जाऊन सर्व नागरिकांची आशा स्वयंसेविका व एक पुरूष स्वयंसेवक यांच्यामार्फत १ डिसेंबर पासून तपासणी सर्वेक्षणास सुरूवात झाली आहे.

आशा स्वयंसेविकेने तपासणी केलेल्या संशयित रूग्णांचे पर्यवेक्षण क्षयरोग व कुष्ठरोग निर्मुलनाचे तालुका पर्यवेक्षक फिरोज महांत , नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक गणेश जाधव, आरोग्य सेवक शिवाजी चव्हाण करीत आहेत. नीरा व परिसरातील नागरिकांनी घरोघरी तपासणी सर्वेक्षण करीत असलेल्या आशा स्वयंसेविका व स्वयंसेवकांना महिती द्यावी असे डॉ. आदित्य धारूरकर यांनी सांगितले.

You might also like