‘ग्राम सुरक्षा पथकामुळे नागरिक सुरक्षित’ : पो. नि. सुरज बंडगर

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकांची सुरक्षेला प्राधान्यक्रम देऊनच पोलिस दलास सहकार्य व्हावे या हेतूने स्थानिक पातळीवर ग्रामसुरक्षा पथके तयार करण्यात आली आहेत. लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील थेऊर येथील हे पथक अतिशय कार्यक्षम असून येथील नागरिकांनी आपण सुरक्षित असल्याची भावना व्यक्त केली आहे असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी केले.

थेऊर येथील ग्राम सुरक्षा पथकाच्या जवानांसाठी येथील व्यापारी वर्ग व नवनाथ काकडे यांच्या वतीने ट्रॅक सुट, मास्क व बुटाचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम चिंतामणी विद्या मंदिर येथे पार पडला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी सरपंच नवनाथ काकडे, माजी उपसरपंच आप्पासाहेब काळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे, पोलिस नाईक नितीन सुद्रीक, गणेश कर्चे, पाटसकर, पोलिस पाटील रेश्मा कांबळे, विद्यालयाच्या प्राचार्या शोभा कोतवाल, तानाजी कुंजीर, युवराज काकडे, पोलिस मित्र संतोष गायकवाड, स्थानिक व्यापारी व व्यावसायिक खंडू गावडे, याकुब शेख, सुनिल अविनाशे, सतिश खंडेलवाल, सावळाराम चौधरी, मंगलाराम चौधरी, उदयसिंह चौधरी आदी उपस्थित होते.

पोलिस निरीक्षक बंडगर पुढे म्हणाले की, अलिकडच्या काळात जबरी चोरीचे प्रमाण वाढले तसेच बंद घरातील चोरीची अनेक प्रकरणे घडू लागली परंतु ग्राम सुरक्षेच्या माध्यमातून यावर आळा बसला आहे. थेऊर मधील सुरक्षा जवान अतिशय मेहनती असून त्याच्यात काम करण्याची ओढ लागली आहे त्यामुळे येथील हे पथक उत्कृष्ट कामगिरी करत आहे.