पुण्याच्या मध्यवस्तीतील ‘त्या’ इमारतीत नव्याने सुरु झालं सेक्स रॅकेट, पोलीस म्हणतात…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळे पुण्यात लॉकडाऊन करण्यात आलं. लॉकडाऊनमध्ये लक्ष्मी रस्त्यावर असलेल्या एका इमारतीमध्ये नव्याने वेश्याव्यवसाय सरु करण्यात आला आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापारी वैतागले आहेत. हा प्रकार थांबवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी येथील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

लक्ष्मी रस्त्यावर असलेल्या सीटी पोस्टाजवळ सव्वाशे वर्षे जुन्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर लक्ष्मी चेंबर्स नावाची 30 वर्षे जुनी इमारत आहे. या इमारतीमध्ये दोन बँका, कार्यालय होती. मात्र, लॉकडाऊनमध्ये एका महिलेने इमारतील घरे भाड्याने घेऊन या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु केला आहे. यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी त्रास सहन करावा लागत आहेत. या प्रकरणी नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. ही इमारत मुख्य बाजारपेठेत व मुख्य रस्त्यावर असल्याने या ठिकाणी नव्याने वेश्याव्यवसाय सुरु केला असून काही दिवसांनी संबंधित महिलांचे प्रमाण वाढेल. त्यामुळे उपद्रवी टोळक्यांचा वावर या ठिकाणी वाढण्याची शक्यता नागरिक आणि व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

मागील तीन महिन्यापासून हा वेश्याव्यवसाय सुरु आहे. त्यातच तीन महिन्यापासून व्यवसाय बंद असल्याने या व्यवसायामुळे व्यापाऱ्यांना फटका बसेल. त्यामुळे हा व्यवसाय करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी असे निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले की, स्थानिक नागरिक व लक्ष्मी रोड व्यापारी वर्गाने आमच्याकडे तक्रार दिली आहे, त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like