बीडमध्ये स्वच्छतादूतांचा असाही ‘सन्मान’, नागरिकांनी व्यक्त केली ‘कृतज्ञता’

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स, स्वच्छता कर्मचारी आपल्या जीवाची आणि कुटुंबाची पर्वा न करता आपली ड्युटी करीत आहेत त्यांचे हे धाडस कौतुकास्पद आहे. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या शहरात रोज साफसफाई करणाऱ्यांचे नागरिकांनी चक्क पाय धुवून ,शाल आणि श्रीफळ देऊन, पुष्पहार घालून सत्कार केला आहे. स्वच्छता दूतांचा केलेला हा सत्कार आता चर्चेचा विषय बनला आहे.

स्वच्छतादूतांबाबत कृतज्ञता

लॉकडाउनमध्ये काम करणाऱ्या सफाई कामगारांबद्दल सामाजिक उतराई म्हणून अंबाजोगाईत नागरिकांनी स्वच्छता सेवकांची पाय धुतले. अनेक वेळा आपण दिंडीमध्ये आणि गुरू पुजानंतर पाय धुवून औक्षण करण्याची प्रथा पाहिली असेल. आज मात्र, सफाई कामगारांनी केलेल्या कामाबद्दलची उतराई म्हणून हा कृतज्ञता सोहळाच म्हणावा लागेल.या सफाई कामगार च्या जोरावर शहराने अनेक वेळा स्वच्छतेचे पारितोषिकही जिंकले आहेत. मात्र, आजचा दिवस या सफाई कामगारासाठी नक्कीच आनंदाचा आहे कारण नागरिकांनी त्यांचे पाय धुऊन जणू त्यांना सुखद धक्का दिला.

राज्यात अंबेजोगाईचा स्वच्छता पॅटर्न प्रसिद्ध

अंबाजोगाई शहराला अनेक वेळा पुरस्कार मिळाले आणि या पुरस्काराच्या जोरावर शहराचा महाराष्ट्रात एक वेगळा पॅटर्न तयार झाला. कोरोनाच्या काळात स्वच्छता करण्यात त्यांनी जी आपली चुनुक दाखवली म्हणून स्वच्छता कामगारांना न सांगताच रविवार पेठ येथील नागरिकांनी त्यांचा हा आगळावेगळा स्वरूपाचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.