पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशात मोठ्या प्रमाणावर डिजिटल प्रणालीला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता अनेक सरकारी योजना किंवा इतर कोणतेही लाभ जनतेला थेट आपल्या खात्यांमध्ये मिळत आहेत. अशात आता ३० डिसेंबर पासून संपूर्ण राज्यात मुद्रांक व नोंदणी फी परतावा नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने मिळणार आहे.
त्यामुळे आता नागरिकांना सारखे नोंदणी व मुद्रांक विभागाकडे हेलपाटे मारावे लागणार नाहीत. याबाबतची सर्व माहिती अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्जदारांनी न्यायीकेत्तर मुद्रांकाचा किंवा दस्त नोंदणीसाठी शासनास भरलेल्या तथापि दस्त नोंदणी न केलेल्या नोंदणी फी चा परतावा मागणीसाठी अर्ज करण्यापूर्वी या प्रणालीमध्ये डाटा एन्ट्री करणे आवश्यक आहे. डाटा एन्ट्री केल्यानंतर, संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित मुद्रांकासह अर्जावर रिफंड कोड नमूद करून विहित मुदतीत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. यासंबंधीचे प्रशिक्षण संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.
घरबसल्या समजेल माहिती
याबाबतची माहिती अनिल कवडे यांनी दिली आहे ऑनलाइन प्रणालीमुळे या कामाला गती मिळणार असून आता लवकर नागरिकांपर्यंत परतावा पोहचणार आहे. तसेच परतावा कोणत्या कारणामुळे थांबलेला आहे किंवा याबाबतचा काय स्टेटस आहे याची माहिती आता घरबसल्या पाहता येणार आहे. तसेच याबाबत एसएमएसद्वारे देखील माहिती मिळणार आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- ‘या’ ५ वनस्पती जवळपास ठेवल्या तर डास जातील पळून !
- ‘या’ ७ उपायांनी मासिक पाळीच्या वेदना होतील दूर !
- ‘सोशल मीडिया’वर सतत ‘अॅक्टिव्ह’ राहण्याचे ‘हे’ आहेत ३ दुष्परिणाम
- उपाशीपोटी ‘हे’ ७ पदार्थ चुकूनही खाऊ नका, जाणून घ्या परिणाम
- ‘या’ ७ कारणांमुळे पोटावर झोपणे आरोग्यासाठी घातक !
- ‘हे’ आहेत चॉकलेटचे ८ आरोग्यदायी फायदे ! जाणून घ्या
- सकाळी चालायला जाता, मग ‘ब्रिस्कवॉक’ घ्या, ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा
- मुळ्याचे ‘हे’ १५ आरोग्यवर्धक फायदे माहिती आहेत का ? जाणून घ्या
- पायावर उभे राहूनही काम करायला शिका, ‘हे’ आहेत ४ फायदे
- ‘हे’ तेल हृदयासाठी ‘टॉनिक’, 9 प्रकारच्या आजारांपासून ठेवतं दूर, जाणून घ्या
- उत्तम आरोग्यासाठी ‘हे’ ४ पदार्थ नियमित खा, जाणून घ्या कोणते