किरीट सोमय्या बिचारा माणूस, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा सणसणीत टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागले. यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये ट्विटर युद्ध सुरु झाले आहे. भाजपच्या किरीट सोमय्या यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या शैलीत सणसणीत टोला लगावला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, किरीट सोमय्या हा बिचारा माणूस आहे. भाजपने खासदारकीचं तिकीट पण कापलं, त्यामुळे होतं नव्हतं ते कामपण गेलं. त्यांना सध्या काहीच काम नाही. थोडफार ते काम करत आहे, तर करु द्या, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी किरीट सोमय्या यांच्यावर पलटवार केला आहे. देशात हिंदू-मुस्लिम वाद कसा पेटवायचा हे भाजपवाल्यांच प्रमुख काम आहे. कांदा-टोमॅटोचा भाव किती आहे. शेतकऱ्यांनी किती आत्महत्या केल्या, किती जणांच्या नोकऱ्या गेल्या, देशाच्या अर्थव्यवस्थेचं काय झालं. याबद्दल ते काही बोलतं नाहीत. त्यामुळे किरीट सोमय्यांसारख्या माणसांना काम करू द्या, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी घुसखोरांबद्दल ट्वीट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. त्यात त्यांनी मुंबईतील शिवाजीनगर, गोवंडी, चांदिवली, ठाणेतील मिरा रोड, भायंदर, नवी मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी घुसखोर आहेत. आता नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर केला आहे. त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, घुसखोरांची हाकालपट्टी करावी अशी मागणी सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like