CAA Protest : आज भारत बंद ! बिहारमध्ये ट्रेन अडवल्या, UP त कलम 144 लागू, कडेकोट पोलीस बंदोबस्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात प्रचंड आगडोंब उसळला आहे. प्रथम ईशान्य भारतातील राज्यात पेटलेले हे आंदोलन आता संपूर्ण देशभर पसरले आहे. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागत आहे. दरम्यान, या कायद्याविरोधात डावे आणि मुस्लिम संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली असून उत्तर प्रदेश, बिहारपासून ते बंगळुरूपर्यंत बंदचा परिणाम दिसून येत आहे. डाव्यांच्या या बंदला विरोधकांनी पाठींबा दर्शवला आहे.

आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश, कर्नाटकतील अनेक भागात मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू आहेत. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतील १४ मेट्रो स्टेशन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथील लाल किल्ला, जामा मशीद, चांदणी चौक आणि विश्वविद्यालयातील प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. जामिया मिलिया इस्लामिया, जसोला विहार, शाहीन बाग आणि मुनिरका मेट्रो स्टेशनांवर मेट्रो थांबणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दिल्लीत डावे पक्ष नागरिकत्व कायद्याविरोधात रामलीलापासून लेडी ब्रेबॉर्न कॉलेजपर्यंत मार्च काढत आहे. तर बुद्धिजिवी वर्ग रामलीला मैदान ते हॉग मार्केटपर्यंत मार्च काढत आहे. बंगळुरूतही बंद मोठ्याप्रमाणात पाळण्यात येत आहे. येथे डावे आणि मुस्लिम संघटना एकत्र आल्या आहेत. यामुळे येथील टाऊन हॉल परिसरात कडेकोट पोलीस तैनात करण्यात आले आहेत. बंगळुरूमध्येही आज कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

मुंबईतही विरोध प्रदर्शन
नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांनी मुंबईत एक आघाडी तयार केली असून हे पक्ष प्रदर्शन करण्यात येत आहे. आम्ही भारताचे लोक अशा आघाडीवर हा मोर्चा काढण्यात आला आहे. ऑगस्ट क्रांती मैदानात विरोध प्रदर्शन होत आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/