नागरिकत्व कायदा : वर्तमान पत्रांमध्ये सरकारनं दिली ‘जाहिरात’, ‘या’ अफवांपासून सावध राहण्यास सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व संशोधन कायद्यावरुन देशभरात होत असलेल्या आंदोलनामुळे सरकारने अखेर वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीतून सरकारने जनतेला आवाहन केले आहे की नागरिकत्व संशोधन कायद्याबाबत चूकीची माहिती पसरवून भ्रमित केले जात आहे. या कायद्यासंबंधित अनेक प्रकारच्या अफवा आणि चूकीच्या सूचना पसरवल्या जात आहेत, परंतु हे कोणत्याही प्रकारचे सत्य नाही. सरकारने जाहिरातीत अफवा आणि सत्य असे दोन कॉलम प्रकाशित केले आहेत, ज्यात लाल रंगात अफवा आणि निळ्या काळ्या रंगात सत्य दर्शवले आहे.

अफवा –
CAA चा उद्देश भारतीय मुसलमानांचे नागरिकत्व काढून घेणे.
सत्य –
सीएए कोणत्याही धर्माच्या भारतीय नागरिकांवर प्रभावित होणार नाही. हा कायदा 2014 पर्यंत भारतात राहणाऱ्या अल्पसंख्यांकांना नागरिकत्व देण्याबाबत आहे, ना कि कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेण्याबाबात.

अफवा 
सीएए भारतीय मुसलमानांना प्रभावित करणार आहे.
सत्य –
हे एक खोटे आहे, सीएए तीन देशातील म्हणजेच पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या अल्पसंख्यांकांवर लागू होईल. हा कायदा मुसलमानांसह देशातील कोणत्याही भारतीय नागरिकांवर लागू होत नाही. त्यामुळे भारतीय मुसलमानांवर याचा प्रभाव होण्याचा प्रश्नच नाही.

अफवा –
अशी कागदपत्र जी नागरिकत्व सिद्ध करतात ती जमा करावी लागतील, ज्यांच्याकडे हे नसेल त्यांना निर्वासित व्हावे लागेल.
सत्य –
हे खोटे आहे. कोणत्याही राष्ट्रीय एनआरसीची घोषणा करण्यात आली नाही. जर कधी लागू केले तर असे नियम आणि निर्देश असेल ज्याचा परिणाम कोणत्याही भारतीय नागरिकावर होणार नाही.

नागरिकत्व संशोधन कायदा कोणत्याही क्षेत्रातील भारतीय नागरिक किंवा धर्मावर विशेष प्रभाव टाकणार नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/