‘नागरिकत्व’ सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर, ‘शिवसेनेने’ टाकला मतदानावर ‘बहिष्कार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेत नागरिकत्व कायदा सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर आज हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले. यावेळी अमित शहांनी विरोधी पक्षांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यानंतर राज्यसभेत या विधेयकावर मतदान पार पडले. यावेळी मतदानावर शिवसेनेने बहिष्कार टाकला. परंतू राज्यसभेत हे विधयेक मंजूर झाले आहे. यावेळी मतदानात विधेयकाच्या बाजुने 125 मते मिळाली तर 105 मते विधेयकाविरोधात पडली.

राज्यसभेत आता हे विधेयक मंजूर झाल्याने देशीत सर्व राज्यांमध्ये हे विधेयक लागू होण्याचा मार्ग रिकामा झाला. या विधेयकाला मोठा विरोध झाला होता. परंतू आज मोदी सरकारचे महत्वाचे विधेयक अखेर मंजूर झाले आहे. त्यामुळे नागरिकत्व कायदा सुधारणा विधेयकाची परिक्षा मोदी सरकारने पास केली.

यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले की हे विधेयक कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. हे विधेयक सर्वांना नागरिकत्व देणारे आहे, कोणाचे ही नागरिकत्व काढून घेणार नाही.

लोकसभेत शिवसेनेने केंद्र सरकारला पाठिंबा देत या विधेयकाच्या बाजूने मतदान केले होते. परंतू त्यानंतर शिवसेनेने आपल्या भूमिकेवरुन यूटर्न घेत आपण राज्यसभेत विधेयकाच्या बाजूने मतदान करणार नाही अशी भूमिका मांडली. काही मुद्दे अस्पष्ट आहेत, ते स्पष्ट होणार नाही तो पर्यंत मतदान करणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर आज राज्यसभेत या नागरिकत्व कायदा सुधारणा विधेयकावर मतदान पार पडले. यात शिवसेनेशिवाय भाजप सरकार राज्यसभेत विधेयक मंजूर करण्यास यशस्वी ठरले.

Visit : policenama.com