भारतात 100 कोटी हिंदू, हे हिंदू राष्ट्रच ! भाजपचे खा. अभिनेता रवी किसननं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून देशात वातावरण तापलं असतानाच भाजपचे खासदार आणि अभिनेता रवी किशन यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भारतात हिंदूंची लोकसंख्या 100 कोटी आहे. सहाजिकच हे एक हिंदू राष्ट्रच आहे, असे रवि किशन यांनी म्हटले आहे. संसद भवनाच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचं समर्थन केले.

रवि किशन म्हणाले, हे विधेयक संसदेत येण हा प्रत्येक हिंदूसाठी अभिमानाचा क्षण आहे. भारतात मुस्लीम आणि ख्रिश्चन लोक सुद्धा मोठ्या संख्येने आहेत. असे असतानाही हिंदूचं स्वतंत्र अस्तित्व, ओळख आणि संस्कृती जिवंत आहे, हा एक चमत्कारच आहे. भारत नावाच्या मातृभूमीमुळंच हे शक्य झालं आहे, असे रवी किशन म्हणाले.

केंद्रीय मंत्रिमंडळान आज नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली. लवकरच हे विधेयक लोकसबेत मांडलं जाणार असून नंतर राज्यसभेच्या मंजुरीसाठी पाठवलं जाणार आहे. विरोधकांनी या विधेयकाला कडाडून विरोध दर्शवला आहे. हे विधेयक घटनाबाह्य आहे. भारतीय संघराज्याच्या चौकटीला तडा देणारे आहे. मुस्लिम समाजाला लक्ष करण्याच्या हेतूनेच केंद्र सरकारने हे विधेयक आणले असल्याचा आरोपी विरोधकांनी केला आहे.

Visit : Policenama.com