अभिनेता कमल हसनची मोदी सरकारवर टीका

चेन्नई : वृत्तसंस्था – सोमवारी (9 डिसेंबर) रोजी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत 311 विरुद्ध 80 मतांनी मंजूर झाले . मात्र असे असले तरी या विधेयकाला अनेकांकडून विरोध केला जात आहे. मक्कल निधी मय्यम (एमएनएम)चे संस्थापक कमल हसन यांनी या विधेयकावर टीका केली आहे. भारताला केवळ एका समुदायाचा देश करण्याचा प्रयत्न हा मूर्खपणा आहे. असे प्रयत्न देशातील तरुणाई हाणून पाडेल. तुमच्या जुन्या संकल्पना लादायला हा काही प्राचीन भारत नाही. काही त्रुटी असल्यास घटनेत सुधारणा करण्यात वावगं नाही. पण त्रुटी नसतानाही घटनेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करणे हा एक प्रकारचा विश्वासघात आहे असे कमल हसन म्हणाले आहेत.

काही त्रुटी असल्यास घटनेत सुधारणा करण्याचे आपले कर्तव्य आहे, परंतु निर्दोष घटनेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करणे विश्वासघात आहे. केंद्राचा कायदा आणि हे विधेयक म्हणजे निरोगी व्यक्तीवर सर्जरी करण्यासारखा प्रकार असून, तो एक प्रकारचा गुन्हा आहे. ज्यांनी यासाठी प्रयत्न केले आणि ते अयशस्वी झाले. आता ते पुन्हा प्रयत्न करीत आहेत असेही कमल हसन म्हणाले आहेत.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 2019 –

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाअंतर्गत बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सहा धार्मिक अल्पसंख्याकांना (हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख) भारताचं नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे.
सद्यस्थितीत भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्षं राहणं आवश्यक असतं. प्रस्तावित विधेयक ही अट शिथिल करून ती सहा वर्षांवर आणण्याची शिफारस करतं.

विरोधकांचा आक्षेप –

हे विधेयक मुस्लीमविरोधी असून भारतीय राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणाऱ्या कलम 14चं उल्लंघन करतं, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. ईशान्य भारतात, विशेषतः आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये या विधेयकाला कडाडून विरोध केला जात आहे.भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात कुणालाही धार्मिक निकषांवरून नागरिकत्व कसं मिळू शकतं, असा आक्षेप विरोधक घेत आहेत.

फेसबुक पेज ला लाईक करा : https://www.facebook.com/policenama/