नगर : एमआयडीसी परिसरात घरफोडी करणारा अटकेत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

एमआयडीसी परीसरात घरफोडी करणा-या गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई नगर येथील वडगाव गुप्ता बायपासरोडवर करण्यात आली.

पप्पू परसराम काळे (वय-३५ रा. वडगांव गुप्ता, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दिनेश भास्कर काळे (वय-३५, रा. एमआयडीसी, अहमदनगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिनेश काळे यांच्या घरामध्ये डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या घरफोडीत घरातील २२ हजारांचे दागिने आणि मोबाईल चोरीला गेले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना या गुन्ह्यातील आरोपी वडगांव गुप्ता बायपास येथे असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून आरोपी पप्पू काळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने दिनेश काळे यांच्या घरात घरफोडी केल्याची कबूली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधिक्षक घनश्याम पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक मनिष कलवाणीया यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे, सुधीर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब मुळीक, योगेश गोसावी, पोलीस नाईक आण्णा पवार, रवि कर्डीले, दिपक शिंदे, रविकिरण सोनटक्के, विनोद मासाळकर, दत्ता गव्हाणे, विजय ठोंबरे, मघराज कोल्हे, चालक बाळासाहेब भोपळे यांच्या पथकाने केली.