काय सांगता ! होय, ‘इथं’ असल्या महागाईत घर फक्त 71 रूपयांमध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात सुंदर देशांपैकी एक असलेल्या देशात फक्त 71 रुपये म्हणजे 1 डॉलरला घर विकायला उपलब्ध आहेत. तुम्ही खरेदी करु इच्छित असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. हे शहर नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत सुंदर आहे. येथील प्रशासनाने फक्त 71 रुपयांना विकायला ठेवले आहेत.

इस शहर में 71 रुपए में बिक रहे हैं घर, क्या आप खरीदेंगे?

या शहरात राहतात फक्त 3800 लोक –
या शहरात फक्त 3800 लोक राहतात. अनेक लोक तर वयोवृद्ध आहेत. परंतू खूपच सक्रिय, ऊर्जावान आणि आनंदी आहेत. येथील तरुण नोकरी करण्यासाठी दुसऱ्या शहरात गेले आहेत.

इस शहर में 71 रुपए में बिक रहे हैं घर, क्या आप खरीदेंगे?

बर्फाची चादर असलेले डोंगर आणि सुंदर दऱ्या-खोऱ्या –
या शहराच्या चहूबाजूंना सुंदर दऱ्या खोऱ्या आहेत. थंडीत हे शहर पूर्णपणे बर्फाने झाकले जाते. उन्हाळ्यात या शहरात सुंदर रंगीबेरंगी फुल फुलतात. येथे कोणतेही प्रदूषण नाही. अत्यंत साफ हवा असलेल्या या शहरात लोकांच्या आजारी पडण्याचे प्रमाण देखील कमी आहे.

इस शहर में 71 रुपए में बिक रहे हैं घर, क्या आप खरीदेंगे?

का स्वस्तात विकायला आहेत ही घर ?
येथील सांस्कृतिक कौन्सिलर एंजेला कॅनिज्जारो यांनी सांगितले की, 40 वर्षापूर्वी येथे जवळपास 8000 पेक्षा जास्त लोक राहत होते. परंतू आता फक्त 3800 लोक येथे राहत आहेत. कारण येथील तरुणवर्ग रोजगाराच्या शोधात दुसऱ्या शहरात गेला आहे. आता येथे त्यांचे आई वडील राहतात. अनेक लोकांची घर रिकामी आहेत. यामुळे येथे हे लोक स्वस्तात घर विकत आहेत.

इस शहर में 71 रुपए में बिक रहे हैं घर, क्या आप खरीदेंगे?

कुठे आहे हे सुंदर घर –
या शहराचे नाव बिवोना आहे. हे इटलीच्या सिसली मध्ये आहे. येथील लोकांना वाटते की जेव्हा येथे बाहेरील लोक येऊन राहतील तेव्हा येथील संस्कृती आधिक बहरेल. ते येथील संस्कृती वाचवण्यात मदत करतील. शिवाय शहरात पुन्हा उत्साह येईल.

Visit : Policenama.com