…नाहीतर नगरचे पिण्याचे पाणी होईल बंद!

अहमदनगर : पोलिसनाम ऑनलाईन – ‘थकबाकीची रक्कम तात्काळ भरा. अन्यथा  पिण्याच्या पाण्याच्या  विद्युत पंपाचा वीज पुरवठा  खंडित करू’, असा इशारा महावितरणने नोटीसीद्वारे महापालिका प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नगर शहराला मुळा धरणातुन पाणीपुवरठा करण्यात येतो. काही महिन्यांपूर्वी झालेल्या प्रशासनाच्या बैठकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये नियमीतचे बिल भरा असे सांगण्यात आले होते. दर महिन्याला त्याचे धनादेश द्यावेत, असा तोडगाही काढण्यात आला होता. त्यानुसार महानगरपालिकेने काही महिन्यांचे धनादेश दिलेले आहे. मात्र, सध्या दोन महिन्याचे धनादेश दिले गेले नाहीत. तसेच मागील पाच हप्तेसुध्दा थकबाकीमध्ये आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची थकबाकी असतानाही ते पैसे भरले नाहीत ही बाबही महावितरण प्रशासनाने निदर्शनास आणली आहे.

नियमितची थकबाकी थकल्यामुळे नेहमी प्रमाणे महावितरणाने महापालिकेने नोटीस बजावली होती. नियिमतच्या बिलास थकबाकी भरावी, अन्यथा विजपुरवठा खंडीत केला जाईल, असे नोटीसमध्ये नमूद केले होते. महापालिका प्रशासनाने महापालिका प्रशासनाचा कारभार निवडणुकीच्या पुर्वीचा प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आहे. एवढे असताना देखीलसुध्दा महावितरणचे नियमीतचे पैसे भरले गेले नाहीत.

महावितरणाने बजावलेल्या नोटीसची मुदत संपली असताना जर तत्काळ पैसे भरले नाही तर पाणीपुरवठा योजनांवरील विज पुरवठा खंडीत केला जाईल असे स्पष्ट केले आहे.

179 कोटींची थकबाकी

नगरपालिका स्थापन झाल्यापासून अतापर्यंत सुमारे मागील थकबाकीसह 179 कोटी रुपयांची थकबाकी महापालिकेकडे आहे. वारंवार नोटीसा बजावूनही मागील थकबाकी मनपाकडून भरली जात नाही.

मार्ग काय काढणार?

नगर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न बिकट झाला असताना आता पुन्हा थकबाकीचा विषय व कारवाईचा विषय केल्यामुळे सत्ताधारी व प्रशासन यातून काय मार्ग काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.