CJI रंजन गोगोई यांनी PM मोदींना पत्र लिहून दिला ‘खास’ सल्ला, म्हणाले..

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा आग्रह केला आहे. याबाबतचे पत्र रंजन गोगोई यांनी मोदींना  लिहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या खंडपीठाची संख्या वाढवण्याची आणि उच्चन्यायालयाच्या न्यायाधीशांचे वय 62 वरून 65 करण्याची विनंती केली आहे.

गोगोई यांनी अनेक काळांपासून प्रलंबित पडून असलेल्या खटल्याचा संदर्भ देत पत्रात लिहिले आहे की हे खटले निकाली काढण्यासाठी न्यायाधीशांची संख्या वाढवण्यात यावी. एवढेच नाही तर गोगोई यांनी पुन्हा एकदा मागणी करुन उच्चन्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्त्या करण्याची विनंती केली आहे. यामुळे बऱ्याच काळापासून प्रलंबित खटले लवकर निकाली निघतील.

2009 साली वाढवण्यात आली होती न्यायाधीशांची संख्या –

आता सध्या सर्वोच्च न्यायालयात 31 न्यायाधीश आहेत, मुख्य न्यायाधीशांनी पत्रात लिहिले आहे की 1988 मध्ये न्यायाधीशांची संख्या 18 वरुन 26 करण्यात आली होती. ती 3 दशकांनंतर वाढून 2009 मध्ये 31 करण्यात आली. वाढत्या खटल्यांची संख्या पाहता न्यायाधीशांची संख्या वाढली पाहिजे. मुख्य न्यायाधीशांनी सांगितले की न्यायालयात 41 हजार 78 केस प्रलंबित आहेत, परंतू आता हा आकडा 58 हजार 669 झाला आहे.

उच्चन्यायालयात 44 लाख प्रकरणे प्रलंबित –

सरकारी आकड्यांनूसार उच्च न्यायालयात जवळपास 44 लाख आणि सर्वोच्च न्यायालयात 58, 700 प्रकरणे प्रलंबित आहेत. पत्रात असे लिहिले आहे की 26 अशी प्रकरणे आहेत, जी 25 वर्षांपासून प्रलंबित आहेत. 100 अशी प्रकरणे जी 20 वर्षांपासून आणि 593 अशी प्रकरणे आहेत जी 15 वर्षांपासून प्रलंबित आहेत. तर 10 वर्षापासून 4977 प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत.

आरोग्यविषयक वृत्त-

हॉटेलमधील “फिंगर बाऊलमध्ये” हात धुणे चुकीचे हे आहेत त्याचे दुष्परिणाम

वेळ नसेल तर … फिटनेससाठी सूर्यनमस्कारही पुरेसे

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे

तुमचे आरोग्य कसे आहे ? याचे उत्तर देईल तुमची जीभ

 

सिने जगत-

मोगॅम्बो खुश हुवा ! गुगलचे ‘डुडल’ द्वारे खल’नायक’ अमरीश पुरी यांना अभिवादन

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा