सगळ्याशी हसून बोलायला मी पुढारी नाही : सरन्यायाधीश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश  नेहमीच आपल्या भूमिकेमुळे चर्चेत राहतात. सीबीआय अधिकारी प्रकरणात सुनावणी दरम्यान, तुमची न्यायपालिकेच्या समोर उभा राहण्याची पात्रता नाही असे सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले होते. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बातचीत करताना तुम्हाला लगेच राग का येतो असे विचारले असता त्यांनी खूपच हजरजवाबी उत्तर दिले आहे. सर्वांशी हसून बोलायला मी काय पुढारी नाही जे मला ज्या ठिकाणी योग्य वाटते तेच मी करतो असे रंजन गोगई म्हणाले आहेत.

न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयावर बोट ठेवून लोक न्यायालयीन कामकाजवर चिखल फेक करत आहेत. त्यामुळे तरुण मुलांना न्यायाधीश होऊ वाटत नाही. म्हणून देशाच्या जबाबदार व्यक्तींनी न्यायपालिकेवर अविश्वास दाखवणे सोडून द्यावे असे सरन्यायाधीश रंजन गोगई म्हणाले आहेत. आपल्या पक्षात निकाल आला नाही कि लोक न्यायालयावर टीका करण्यास सुरु करतात. असे करणे कदापि योग्य होऊ शकत नाही असे गोगई म्हणाले आहेत.

तुम्हाला लगेच राग का येतो असा प्रश्न विचारताच रंजन गोगई यांनी त्वरित उत्तर दिले, मी काय पुढारी नाही. जो सर्वांशी हसून बोलले आणि सर्वाना खुश ठेवेल. सर्वांना माझे वागणे आवडत नसेल. परंतु कोण जर फालतू बोलत असेल तर त्या ठिकाणी मी काय करावे असा सवाल रंजन गोगई यांनी केला आहे.