हैदराबाद रेप केस : आरोपींच्या एन्काऊंटरबाबत सरन्यायाधीश शरद बोबडेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

तेलंगणा : वृत्तसंस्था – हैद्राबाद रेप केस मधील आरोपींच्या एन्काऊंटरनंतर सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी मोठं विधान करत टीका केली आहे. जोधपूरमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. न्याय कधीही प्रतिशोधाच्या भावनेनं करू नये. न्याय जर प्रतिशोधाच्या भावनेनं केला तर त्याला अर्थ राहणार नाही असं शरद बोबडे म्हणाले.

जोधपूर येथे राजस्थान उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन समारंभात बोलताना शरद बोबडे म्हणाले, “कोणताही न्याय घाई घाईत करू नये. जर न्याय प्रतिशोधाच्या भावनेनं केला तर त्याचा गाभा नाहीसा होईल.” यावेळी कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही उपस्थिती लावली होती.

हैद्राबादमधील पीडितेच्या पोस्ट माॅर्टेम रिपोर्टमधून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, 4 जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला होता. पीडितेला जवळपास 7 तास बांधून ठेवण्यात आलं होतं. बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पीडितेवर अत्याचार करण्यात आले. चौघांनी मिळून तिला टॉर्चर केल्याचाही रिपोर्टमध्ये उल्लेख आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like