लॉकडाऊन दरम्यानच RBI नं रद्द केलं महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या बँकेचं ‘लायसन्स’, लाखो खातेधारकांचे पैसे अडकले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सीकेपी सहकारी बँक लिमिटेडच्या बँकेचा परवाना रद्द केल्याने या बँकेच्या ग्राहकांना धक्का बसला आहे. मनीकंट्रोलच्या मते, यामुळे सुमारे सव्वा लाख बँक खातेदारांवर संकट उभे राहिले आहे. बॅंकेची ४८५ कोटींची एफडी देखील अडकली आहे.

२०१४ पासून आरबीआय सतत बँकेवरील बंदीची मुदत वाढवत आहे. यापूर्वी ३१ मार्च रोजी ही मुदत ३१ मेपर्यंत वाढवण्यात आली होती, परंतु आरबीआयने त्यापूर्वीच बँकेचा परवाना रद्द केला आहे.

रद्द झाला आहे का बँकेचा परवाना ?
मनीकंट्रोलच्या स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीकेपी सहकारी बँकेच्या नेटवर्थमध्ये घट झाल्यामुळे त्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे. चालू नफा असूनही नेटवर्थ घटल्यामुळे बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

सीकेपी बँकेचे मुख्यालय दादर, मुंबई येथे आहे. एका वृत्तानुसार, बँकेचा तोटा वाढल्यामुळे आणि नेटवर्थमध्ये संपत्तीत मोठी घसरण झाल्यामुळे बँकेच्या व्यवहारावर २०१४ साली बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर बँकेचा तोटा कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले.

यासाठी गुंतवणूकदार-ठेवीदारांनी देखील प्रयत्न केले. त्यांनी व्याज दरात कपात केली होती. व्याजदर २ टक्क्यांपर्यंत केले गेले होते. काही लोकांनी स्टॉकमध्ये त्यांची एफडी गुंतवली होती आणि काही प्रमाणात त्याचे परिणामही दिसू लागले होते. बँकेचा तोटा कमी होत होता, पण अशा परिस्थितीत आरबीआयने सीकेपी बँकेचा परवाना रद्द करून गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आहे.