आगामी 48 तासात राज्यात ‘सत्तास्थापन’ दावा ?

मुंबई : पोलीसनामा ऑनालाइन – राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांनंतर उद्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे, परंतू त्याआधीच माहिती मिळत आहे की महाविकासआघाडीकडून पुढील दोन दिवसात सत्तास्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी, काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून ही माहिती मिळत आहेत.

दिल्लीत आज बऱ्याच घडामोडी घडल्या. आज झालेल्या बैठकीनंतर महाविकासआघाडीचा फॉर्म्युला ठरल्याचे वृत्त आले. यात शिवसेना राष्ट्रवादीला प्रत्येकी 15 – 15 मंत्रिपद तर काँग्रेसला 12 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान उद्या मुंबईत आघाडीच्या नेत्यांची बैठकी होणार आहे. त्याआधीच 48 तासात सत्तास्थापनेचा दावा आघाडीच्या नेत्याकडून करण्यात आला आहे.

त्यामुळे आज झालेल्या बैठकीत महाविकास आघाडी सत्तेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. 2 दिवसात निर्णय होईल असे देखील जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्याकडून सांगण्यात आले होते. परंतू आता दावा करण्यात येत आहे की महाविकासआघाडी येत्या 48 तासात सत्तास्थापन करेल. उद्धव ठाकरेंशी चर्चेनंतर अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

5 वर्ष सरकार टिकेल
या बैठकीनंतर बोलताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले की उद्या बैठकीनंतर तातडीने पावले उचलली जातील. मित्र पक्षांना विश्वासात घेऊनच सर्व निर्णय घेण्यात येईल. सरकार पाच वर्ष टिकले का असे विचारल्यावर जयंत पाटील म्हणाले की सरकार पाच वर्ष टिकावे याचसाठी सर्व मुद्यांवर चर्चा आणि बैठक सुरु आहे. सरकार 5 वर्ष काय 15 वर्ष टिकेल.

शिवसेनेसोबत सरकार कसे चालवणार यावर बोलताना जयंत पाटलांनी स्पष्ट केले की राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत सरकार चालवण्याचा अनुभव आहे. शिवसेना पहिल्यांदाच आमच्यासोबत सरकारमध्ये असेल. त्यामुळे सरकार चालवताना सहकार्य आवश्यक असेल.

Visit : Policenama.com