नितिन गडकरींचा भाऊ असल्याचे सांगत 5 लाखांची फसवणूक, पिता-पुत्रास अटक

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन – माझा भाऊ नितिन गडकरी Nitin Gadkari मंत्री असून आयकर विभागात Income Tax Department जे सोने Gold पकडतात ते कमी किमतीत माझ्या ओळखीवर मिळवून देतो. तुम्ही मला 5 लाख रूपये द्या, अशी बतावणी करून एकाला 5 लाखांचा गंडा घालणा-या बापलेकाला विष्णू नगर पोलिसांनी Vishnu Nagar Police बंगळूरू येथून अटक Arrested केली आहे.

Surya Grahan 2021 : सूर्य ग्रहणामुळे येत्या 45-90 दिवसात होणार उलथा-पालथ ? ज्योतिषांनी केली मोठ्या संकटाची भविष्यवाणी

राजन गडकरी, आनंद गडकरी असे अटक केलेल्या बापलेकांची नावे आहेत.
या प्रकरणी अमोल पळसमकर यांनी विष्णुनगर पोलिसांत तक्रार दिली होती.
अटक Arrested केलेल्या गडकरी बापलेकांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

विष्णुनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडकरी बापलेकांनी आयकर विभागात जे सोने पकडतात ते कमी किमतीत तुम्हाला माझे ओळखीवर मिळवून देतो.
तुम्ही मला 5 लाख रूपये दया असे पळसमकर यांना म्हणाले होते.
यावर विश्वास ठेवत पळसमकर यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये त्यांना 5 लाखांचा चेक दिला होता.
एक ते दोन महिन्यात तुम्हाला तुमचे सोने मिळून देऊ असे राजन यांनी सांगितले होते.
परंतु, दोन महिने उलटूनही सोने मिळाले नाही.
त्यानंतर आपली फसवणूक Fraud झाल्याचे लक्षात येताच पळसमकर यांनी विष्णुनगर पोलीसात गडकरी पिता-पुत्रंविरोधात तक्रार दाखल केली होती.
या गुन्हयाचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश जाधव यांच्या पथकाने बुधवारी दोघांना बंगळूरू येथून अटक केली आहे.

रूग्वेदचा ताबा आईकडे
24 मे पासून राजन, त्यांची पत्नी अलका, मुलगा आनंद आणि नातु रूग्वेद असे बेपत्ता झाल्याची तक्रार सुन गितांजली गडकरी यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात दिली होती. गडकरी पिता-पुत्र रुग्वेदला घेऊन बंगळूरूला गेले होते. त्या दोघांना अटक केल्यानंतर लहान मुलगा रूग्वेद याचाही ताबा त्याची आई गितांजलीकडे देण्यात आला आहे.

READ ALSO THIS :

Aurangabad News | औरंगाबादमध्ये वीज कोसळून युवतीचा दुर्देवी मृत्यू, 1 जण गंभीर जखमी

BCCI Big Announcement | इंग्लड दौऱ्यानंतर रंगणार आयपीएलचा थरार; बीसीसीआयने केली मोठी घोषणा

Congress Leader Sachin Pilot : भाजपवासी झालेल्या ‘या’ महिला नेत्याचा मोठा दावा, म्हणाल्या – ‘सचिन पायलट यांच्याशी बोलणं झालंय, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील’