Clapping Benefits | बोलताना टाळी वाजवत असाल तर होतील ‘हे’ फायदे, जाणून तुम्हाला वाटेल आश्चर्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम – एखाद्याचे बोलणे आवडले असेल किंवा त्याचे काम आवडले असेल तर तुम्ही टाळ्या वाजवल्या (Clapping) असतीलच. जगात असा एकही व्यक्ती नसेल की ज्याने टाळी वाजवली नसेल. पण आपल्यापैकी कित्येकांना अद्याप टाळ्या वाजवण्याचे फायदे (Clapping Benefits) माहित नसतील. तर आज तुम्हाला टाळ्या वाजवण्याचे फायदे सांगणार (Clapping Benefits) आहोत. फायदे जाणून घेतल्यास तुम्हालाही टाळ्या वाजवण्याची सवय नक्कीच लागेल. आपण भजन-किर्तनात श्रद्धेने टाळ्या वाजवतो, आरोग्यासाठी नाही. मात्र टाळी वाजवण्याचे फायदे तुम्हाला समजले तर तुम्ही आजपासून टाळ्या वाजवू लागाल.

 

टाळ्या वाजवण्याचे काय आहेत फायदे
टाळी वाजवणे (Clapping Benefits) हा एक प्रकारचा योगा (Yoga) आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. ज्या प्रकारे आपण योगा अभ्यासाची कोणतीही मुद्रा करतो, त्याच प्रकारे टाळ्या वाजवण्याची देखील मुद्रा आहे. टाळी वाजवण्याच्या सवयीमध्ये एवढी ताकद आहे की त्यामुळे तुमची अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. आरोग्याच्या फायद्यासाठी (health benefits), टाळी वाजवताना हाताच्या तळव्यावर आणि बोटाने बोटावर मारणे आवश्यक आहे. ज्यावेळी तुम्ही टाळी वाजवता त्यावेळी हाताचे दोन्ही तळवे आणि बोटे एकमेकांवर आदळतात. त्यामुळे रक्ताचा प्रवाह (Blood flow) वाढतो आणि आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये असलेले सर्व अडथळे दूर होतात. तसेच टाळ्या वाजवल्याने कोलेस्ट्रॉल (Cholesterol) देखील कमी होते.

 

टाळ्या वाजवल्याने डोळ्यांनी कमी दिसण्याची समस्या कमी होते, असा दावा अनेकांनी केला आहे.
त्यांनी सकाळी अर्धा तास टाळ्या वाजवल्या, त्यामुळे त्यांना हा फायदा झाला. त्याचवेळी तज्ज्ञांनी दावा केला आहे आहे की,
टाळ्या वाजवण्यापूर्वी मोहरी (Mustard oil) किंवा खोबरेल तेल (coconut oil) तळहातांना लावावे.
हे तेल टाळ्या वाजवत असताना आपल्या शरीरात जाते. याशिवाय टाळ्या वाजवताना हातामध्ये मोजे अवश्य वापरावे.
जेणेकरुन शरीरात निर्माण होणाऱ्या उर्जा लहरी शरीराच्या बाहेर जाणार नाहीत.

टाळ्या वाजवण्याची पद्धत
टाळी वाजवताना दोन्ही हाथ एकमेकांसमोर असले पाहिजेत आणि हात मोकळे ठेवले पाहिजेत. टाळी वाजवताना बोटं आणि तळवा एकमेकांवर आदळले पाहिजे.
टाळी वाजवण्याचा फायदा जेव्हा होईल ज्यावेळी तुमी एकावेळी कमीत कमी 1500 वेळा टाळ्या वाजवाल. तुम्ही तुमच्या क्षमेतेनुसार जास्त टाळ्या वाजवू शकता.

 

या समस्या दूर होतील
असेही म्हटले जाते की, टाळ्या वाजवल्याने हृदयविकार (Heart Disease), मधुमेह (Diabetes),
उच्च रक्तदाब (Hypertension), टेन्शन, दमा (Asthma), सर्दी, सांधेदुखी, डोकेदुखी, निद्रानाश,
केस गळणे, कमी दिसणे अशा समस्यांमध्ये टाळ्या वाजवणे फायद्याचे ठरते.
जर तुम्हालाही या समस्यांनी ग्रासले असेल तर आजपासून टाळ्या वाजवणे हे तुमच्या सवयीचा भाग बनवा.

 

Web Title :- Clapping Benefits | benefits of clapping if you also clap when you talk you will be surprised to know the benefits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Modi Government | मोदी सरकारने 23 कोटी लोकांच्या खात्यात पाठवले पैसे, तुमच्या खात्यात आले नाहीत का? तात्काळ ‘इथं’ करा तक्रार

Hruta Durgule | ‘फक्त 8 दिवस बाकी’ असं म्हणत ऋता दुर्गुळेनं शेअर केला प्रियकरासोबत फोटो, चाहत्यांमध्ये रंगल्या तुफान चर्चा

‘या’ Multibagger Penny Stock मध्ये 3 वर्षात 1 लाख रुपयांच्या बदल्यात मिळाले 91 लाख रुपये, 2 रुपयांच्या शेयरचा भाव झाला 196 रुपये