दिशा सॅलियानच्या ‘त्या’ पोस्टमार्टेम रिपोर्टबाबत मुंबई पोलिसांचं पहिल्यांदाच मोठं स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. दिशा सॅलियान हिनं केलेल्या शेवटच्या पार्टीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातच आता दिशाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. दिशाचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला होता, असं समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता आणखी वाढत चालला आहे. दिशाच्या शवविच्छेदन अहवालाबाबत आता मुंबई पोलिसांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे.


विभागीय पोलीस आयुक्त विशाल ठाकूर यांनी दिशाच्या शवविच्छेदन अहवालावर स्पष्टीकरण देताना दिशा सॅलियनचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला होता हे वृत्त त्यांनी फेटाळून लावले आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नाही. घटनेनंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले होते. पोलिसांनी दिशा सॅलियानच्या मृतदेहाचा पंचनामा केला तेव्हा तिचे आई-वडील त्या ठिकाणी उपस्थित होते, असे विशाल ठाकूर यांनी सांगितले आहे.

दिशा सॅलियनचा शेवटचा व्हिडिओ

Posted by Marathi Viral News on Saturday, August 8, 2020

पोलिसांनी अंकिताचा जबाब नोंदवला
दुसरीकडे दिशाच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तिची मैत्रीण अंकिताचा जबाब नोंदवला आहे. अंकिता ही लंडन येथे राहते. दिशानं आत्महत्या केली त्या रात्री तिनं अंकिताशी संवाद साधला होता. एवढंच नाही तर व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून दिशानं अंकितासोबत अडचणी शेअर केल्या होत्या.

दिशाचा आत्महत्येपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, दिशाच्या आत्महत्येच्या एक तासापूर्वीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. एका पार्टीचा व्हिडीओ असून त्यात दिशा दिसत आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ 8 जूनला पार्टी झाली त्यावेळचा आहे. या पार्टीनंतर दिशाने आत्महत्या केली होती. या व्हिडिओत दिशा आणि तिचे मित्र एका काश्मिरी सिनेमातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दिशाही डान्स करताना दिसत आहे. दिशानेच हा व्हिडीओ आपल्या मित्रांना व्हॉट्सअ‍ॅपवरून शेअर केला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like