४० हजाराची लाच घेताना जात पडताळणी समितीचा लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या शाळा, महाविद्यालयाच्या प्रवेशाचे दिवस आहेत. अ‍ॅडमिशनसाठी अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यात जात वैधता प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला महत्वाचा ठरतो. त्यामुळे अडलेल्या पालकांना नाडणाऱ्यांची संख्याही राज्यभरात लक्षणीय आहे. पण, त्याचा आपल्या पाल्याच्या प्रवेशात अडथळा होईल, या भितीने कोणी तक्रार करत नाही. भुसावळमधील एक ५० वर्षांचे पालक यांनी धाडस करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. कॉलेज प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जात पडताळणी समितीच्या लिपिकासह अभियांत्रिकी महाविद्यालयातील २ लिपिकांना रंगेहाथ पकडले.

श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक घनशाम रामगोपाल टेमानी (वय ४०, रा. राम मंदीर वार्ड, भुसावळ, ता. भुसावळ, जि. जळगाव), जळगावमधील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे लिपिक ललित खुशाल किरंगे (वय ४२, रा. वेडीमाता मंदिराजवळ, विद्यानगर, भुसावळ ता. भुसावळ, जि. जळगाव) आणि जिल्हा जात पडताळणी समितीचे वरिष्ठ लिपिक ललीत वाल्मीक ठाकरे (वय ३९, रा. सेंट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा, जळगाव, ता. जि. जळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबतची माहिती अशी, तक्रारदार यांच्या मुलीला हिंदी सेवा मंडळाच्या भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी त्यांना जात वैधता प्रमाणपत्राची (कास्ट व्हॅलिडिटी) आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. त्याशिवाय अ‍ॅडमिशन मिळू शकणार नसल्याचे त्यांना सांगितले. हे जात प्रमाणपत्र तातडीने मिळून देण्यासाठी तिघांनी संगनमत करुन तक्रारदारांकडे ४० हजार रुपयांची लाच मागितली.

तक्रारदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आल्यानंतर पोलीस उपअधीक्षक जी. एम. ठाकुर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी व त्यांच्या पथकाने त्याची पडताळणी केली. त्यात त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी सापळा रचला. बुधवारी तक्रारदारांकडून ४० हजार रुपयांची लाच घेताना घनशाम टेमानी याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याला सहाय्य करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली.

लक्ष केंद्रित का होत नाही ? जाणून घ्या यामागील कारणे

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा

निद्रानाशाच्या गंभीर समस्येवर करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like