मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात पोस्ट करणार्‍याचं केलं ‘टक्कल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध चुकीचे विधान केल्याच्या रागातून शिवसेना शाखाप्रमुख समाधान जुगदर याने पोस्ट टाकणाऱ्याला तक्रारदाराला मारहाण करुन त्याचे चक्क टक्कल केले होत.. सुरुवातीला त्याने घाबरुन याबाबत तक्रार दिली नव्हती. परंतु, त्याचे टक्कल करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता त्याने वडाळा टी टी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी हिरामण तिवारी यांनी फिर्याद दिली आहे. नागरिकत्व कायद्यावरुन आंदोलनात जामिया विद्यापीठात दिल्ली पोलिसांनी घुसून विद्यार्थ्यांना मारहाण करुन ताब्यात घेतले होते. या मारहाणीची तुलना उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बागेतील ब्रिटीशांनी केलेल्या मारहाणीशी केली होती. त्याविरोधात तिवारी यांनी एक पोस्ट फेसबुकवर टाकली होती. तिवारी हे वडाळ पूर्वेकडील परिसरात कुटुंबियासोबत राहतात. ते फार्मा कंपनीत कामाला आहेत. बजरंग दलाचे काम करतात. तिवारी यांच्या पोस्टमुळे त्यांना शिवसैनिकांनी धमक्या दिल्या होत्या. जुगदर याने त्याचा जाब विचारल्यानंतर त्यांनी माफी मागून पोस्ट डिलिट केली.

मात्र, त्यामुळे शिवसैनिकांचे समाधान झाले नाही. त्यांनी तिवारी याला घरातून बाहेर चौकात आणले. त्याला मारहाण करुन त्याचे केस कापून टक्कल करण्यात आले. सुरुवातीला त्याने घाबरुन तक्रार दिली नव्हती. पण, त्याचे टक्कल करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याने आता वडाळा टी टी पोलिसांनकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी जुगदर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याच्या तक्रारीवरुन तिवारी याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/