जमीनीच्या वादातून भाजपच्या ‘या’ आमदाराला मारण्याची धमकी ; कार्यालयाची तोडफोड

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाइन – जमीनीच्या वादातून भाजपाच्या आमदाराच्या बंगल्यात राडा घालून मारण्य़ाची धमकी देत कार्यालयाची तोडफोड केली. मीरा भाईंदरचे भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या बंगल्यामध्ये जमीनीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. हातामध्ये धारदार शस्त्र आणि हॉकी स्टीकसह लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आमदार मेहता यांचे स्वीय सहाय्यक दर्शन शर्मा यांनी फिर्याद दिली आहे. जमीनीच्या वादातून झालेल्या राड्यामुळे खळबळ उडाली आहे.

दर्शन शर्मा यांनी नवघर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्य़ादी नुसार, आमदार मेहतांच्या निवासस्थानी रविवारी रात्री आठच्या सुमारास भाजपाचा पदाधिकारी असलेला फिरोज शेख हा दादर येथे राहणाऱ्या मनीष ओझा याला घेऊन आला होता. मनिष ओझा याची कनकिया भागात जमीन असून अजय दुबे याला जमीन विकली आहे. मात्र, व्यवहारावरून दोघांमध्ये वाद होता. हा वाद मिटवण्यासाठी आमदार मेहतांच्या बंगल्यावर आले होते.

यावेळी दुबे बंधू आणि ओझा यांच्यामध्ये वाद झाले. ओझा आणि त्याच्या साथिदारांनी दुबे बंधूंवर हल्ला चढवला. ओझाने हॉकी स्टीक व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करत अजय दुबे याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. तसेच ओझा याने आरडा ओरडा करत आमदार मेहतांच्या कार्यालयाची तोडफोड केली. दरम्यान, सुरक्षा रक्षक आल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. या घटनेमुळे परिसरात तणाव होऊन पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शर्मा यांच्या फिर्य़ादेवरून मनीष ओझासह त्याच्या साथिदारांवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी बनसोडे आणि जाधव याला अटक केली असून ओझासह इतर साथिदार फरार झाले आहेत. पोलीस ओझाचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक थाटकर करीत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त-
बेलाच्या पानात लपलय लोकसंख्या रोखण्याचं ‘गुपित’, ‘कॅन्सर’ आणि ‘लिव्हर’साठी देखील फायदाच
#YogaDay2019 : नियमित योगा करा…आणि स्मरणशक्ती वाढवा
#YogaDay2019 : मधुमेहाच्या रूग्णांसाठी वरदान आहे ‘मुद्रासन’