मुंबईत शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांत तुफान ‘राडा’; मनसे पदाधिकार्‍याच्या डोळ्याला गंभीर दुखापत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – shiv sena | नालेसफाईच्या मुद्द्यावरून शिवसेना (shiv sena) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत मनसेच्या एका पदाधिका-याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथे ही घटना घडली आहे. दरम्यान, मेघवाडी पोलिसांनी हाणामारी करणाऱ्या मनसे आणि शिवेसनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. clashes between shiv sena and mns workers in jogeshwari

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

प्रवीण मर्गज असे जखमी मनसे पदाधिका-याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, जोगेश्वरी पूर्वेला असलेल्या प्रभाग 73 मधील शिवसेने (shiv sena) चे नगरसेवक प्रविण शिंदे यांच्या घराशेजारील मजास नाल्याचे साफसफाईचे काम सुरू होते. तेथे मनसेचे उपाध्यक्ष प्रवीण मर्गज यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी त्याठिका उपस्थित असलेल्या कंत्राटदाराला विचारणा केली. त्याच वेळी त्या ठिकाणी शिवसेने (shiv sena) चे नगरसेवक शिंदे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह आले. त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली आणि काही वेळातच या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीपर्यंत गेले. मेघवाडी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजीव पिपळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाणामारीत मनसेचे नेते प्रविण मर्गज यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली. हे भांडण आणखी वाढू नये यासाठी घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

Web Title : clashes between shiv sena and mns workers in jogeshwari

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Advt.

हे देखील वाचा

Pune News | ‘आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, आम्हाला काही नको’,
तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढा, संजय राऊतांचा पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला

Pune News | पोलीसनामाच्या बातमीचा दणका ! अखेर शिरुरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई

EPFO | बदलणार PF खात्याशी संबंधीत नियम, EPF चे पैसे पाहिजेत तर आजच पूर्ण करा ‘हे’ काम

Pimpri Crime News | ‘बजाज’ मधून निम्म्या किंमतीत गाड्यांचे आमिष पडले साडेसात लाखांना; बजाज कंपनीत अधिकारी असल्याचे सांगून दोघा भावांनी घातला व्यावसायिकाला गंडा