जम्मू-काश्मीर : 2 दहशतवाद्यांचा ‘खात्मा’ !

श्रीनगर : गुरूवारी पहाटे पाचच्या सुमारास जम्मू-काश्मीरमधील जम्मू-श्रीनगर महामार्गावर असलेल्या नगरोटामधील बान परिसरातील असलेल्या टोल नाक्याजवळ लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

पहाटे पाचच्या सुमारास दहतवाद्यांनी नगरोटा परिसरातील बान टोलनाक्याजवळ सुरक्षा दलांवर गोळीबार केला. हे दहशतवादी एका गाडीमध्ये लपले होते. या चकमकीनंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी नगरोटा येथील राष्ट्रीय महामार्ग बंद केला आहे, अशी माहिती जम्मूचे जिल्हा पोलिल प्रमुख एसएसपी श्रीधर पाटील यांनी दिली आहे.

दहशतवाद्यांविरोधात झालेल्या या चकमकीत सीआरपीएफ आणि एसओजीचे जवान सहभागी झाले होते. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. चकमकीनंतर उधमपूरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली.