धक्‍कादाय ! इयत्‍ता 3 री मध्ये शिक्षण घेणार्‍या मुलीनं बाथरूममध्ये पेटवून घेतलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील भदोही जिल्ह्यातील इंग्रजी माध्यम शाळेत इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीने शौचालयात जाऊन रॉकेल अंगावर ओतून स्वत:ला पेटवून घेतले. हे पाहून शौचालयाच्या दाराबाहेर उभा असलेला तिचा भाऊ जोरात ओरडला. यानंतर, शिक्षकांनी दरवाजा तोडला आणि विद्यार्थिनीला बाहेर काढले, आणि त्वरित तिला सीएससी औरई येथे नेण्यात आले, तेथे प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना वाराणसी ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवले.

विद्यार्थिनी कोतवाली परिसर खेड्यातील औरई येथे तिसरीत सेंट जॉन स्कूलमध्ये शिकत होती आणि भाऊ पहिलीला होता. दोघेही सकाळी 7 वाजता औरई कोतवालीपासून 100 मीटर अंतरावर वेस्ट सेंट जॉन स्कूलमध्ये गेले. यानंतर, मुलगी थेट वर्गात न जाता बाथरूममध्ये गेली.

अस्पताल में घायल छात्रा।

तिने आत जाऊन शौचालयाचा दरवाजा बंद केला. सोबत तिचा भाऊही शौचालयाच्या दाराबाहेर आपल्या बहिणीची वाट पाहत उभा होता. थोड्या वेळाने शौचालयाच्या आतून धूर येऊ लागला. यावर भावाने जोर जोरात ओरडायला सुरुवात केली. त्याचा आवाज ऐकून तेथील शिक्षक शौचालयाच्या दिशेने धावले, परंतु शौचालयाचा दरवाजा आतून बंद होता.

शौचालयाचा दरवाजा तोडून शिक्षकांनी विद्यार्थिनीला बाहेर काढले. ती बेशुद्ध पडली होती. विद्यार्थिनीचा चेहरा, मान आणि शरीराचे अवयव भाजले होते. त्वरित शिक्षकाने तिला रूग्णालयात हलवले.

प्रकृती चिंताजनक झाल्याने डॉक्टरांनी त्यांना वाराणसी ट्रॉमा सेंटर येथे पाठवले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. त्याचबरोबर टीव्ही सिरिअल पाहून मुलीने असे पाऊल उचलले असावे असे तिच्या घरच्यांचे मत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –