चर्चा तर होणारच ! मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर पत्नीसह मार्केटला गेले अन् पिशवी खांद्यावर घेऊन आले

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अधिकारी म्हटले की नेहमी एसी कार्यालय, अलिशान गाड्या, हाताखाली नोकर-चाकर असे चित्र नेहमीच आपल्याला पाहायाला मिळते. एवढेच नाही तर साधा तलाठी सुद्धा बाजराला गेले तर सोबत पिशवी पकडण्यासाठी कोतवाल असल्याचे आपण अनेकवेळा पाहिले आहे. मात्र, असे असतानाही मराठवाडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पत्नी सोबत खुलताबाद येथील आठवडी बाजारात जाऊन बाजार करत चक्क भाजीपाल्याने भरलेली थैली खांद्यावर घेतली. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांचा हा साधेपणा अनेकांना भावला असून सध्या त्यांचीच चर्चा सुरु आहे. केंद्रेकर यांच्यासारखे अधिकारी किंचितच पाहयला मिळता, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त केली जात आहे.

नेहमी आपल्या साधेपणामुळे ओळखले जाणारे मराठवाडा विभागीय अधिकारी सुनील केंद्रेकर यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. ते नेहमी आपल्या कडक शिस्तीमुळे आणि सामान्यांसाठी निर्णय घेणारे अधिकारी म्हणून चर्चेत असतात. क्लास वन अधिकारी जरी असले तरी ते घरी शेतातील कामे आजही करतात. त्यामुळे त्यांची नेहमीच चर्चा असते. आता त्याचे आठवडी बाजारात पत्नीसोबत बाजार करतानाचे फोटो समोर आले आहे. ज्यात केंद्रेकर बाजाराची पिशवी स्वतःच्या खांद्यावर घेतलेले दिसून येत आहे. केंद्रेकर हे शेतकरी कुटुंबातून आले आहे. त्यामुळे घरी असताना शेतीचे काम सुद्धा करतात. त्यांचा हा साधेपणा नेहमी चर्चेत असतो.