क्लीन चेस्टसाठी 5 महत्त्वाच्या टीप्स ! केवळ 6 पॅक्स नव्हे तर ‘हे’ देखील महत्त्वाचं, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अनेक पुरुष असे आहेत ज्यांना चेस्ट हेअर आवडत नाही त्यामुळं ते क्लीन चेस्ट ठेवणंच पसंत करतात. अशात क्लीन चेस्टसाठी काहीजण व्हॅक्सिंग करतात. पुरुषांचे केस हे रफ असल्यानं व्हॅक्सिंग करताना त्यांना जास्त वेदना होतात. परंतु काही टीप्स फॉलो करून या वेदना कमी केल्या जाऊ शकतात.

1) टेस्ट गरजेची – कोणतंही ब्युटी प्रॉडक्ट वापरताना त्याची टेस्ट करणं गरजेचं आहे. काही हर्बल प्रॉडक्टमध्ये देखील केमिकल असतात ज्याचा त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो. शरीरावर एका ठिकाणी लावून त्यानं काही त्रास होत नाही ना याची खात्री करावी.

2) केसांच्या लांबीकडे लक्ष द्या – जर केस जास्त लहान आणि रफ असतील तर केसांची व्हॅक्सिंग करणं जास्त अवघड जातं. केसांची लांबी किमान 1 सेंटीमीटर वाढू द्या. यानंतरच व्हॅक्सिंग करा.

3) डिस्पोजेबल स्ट्रीप्स वापरा – व्हॅक्स करताना कायमच डिस्पोजेबल स्ट्रीप्सचा वापर करा. कारण कापडाच्या वापरानं इंफेक्शनचा धोका जास्त असतो.

4) स्वछता – व्हॅक्सिंग करण्यासाठी आधी साध्या पाण्यानं अंघोळ करा. यामुळं शरीरावरील धूळ, माती, घाम निघून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. व्हॅक्सिंग करण्यापूर्वी छातीवर अँटीसेप्टीक जेल आणि पावडरचा वापर नक्की करा. यामुळं त्वचेवर रॅशेज होत नाहीत.

5) व्हिक्सिंगनंतर हे करा – व्हॅक्सिंग ही एक वेदनादायी प्रोसेस आहे. त्यामुळं व्हॅक्सिंगनंतर त्वचा आणि शरीराला आराम देणं गरजेचं आहे. व्हॅक्सिंग नंतर तुम्ही त्या भागावर थंड पाण्यानं किंवा आईस क्युबनं मसाज करू शकता. व्हॅक्सिंगनंतर मॉईश्चरायजर नक्की लावा.

6) कॉटनचे कपडे – व्हॅक्सिंगनंतर जास्त टाईट कपडे वापरू नका. थोडे सैल आणि कॉटनचे कपडे घाला. याशिवाय व्हॅक्सिंगनंतर लगेच सूर्यकिरणांमध्ये जाणं टाळावं. चांगल्या सनस्क्रीनचा वापर करा.