Clean Chit To Aryan Khan In Cordelia Cruise Drugs Case | कॉर्डिलिया ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला NCB कडून क्लीनचीट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Clean Chit To Aryan Khan In Cordelia Cruise Drugs Case | कॉर्डिलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Clean Chit To Aryan Khan In Cordelia Cruise Drugs Case) आरोपांच्या वादात सापडलेल्या अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) आता अमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून Narcotics Control Bureau (NCB) क्लीनचीट देण्यात आले आहे. एनसीबीकडून न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये आर्यन खानचे नाव घेतले नाही. त्यामुळे एनसीबीकडून आर्यनला क्लीन चिट मिळाली आहे.

 

एनसीबीचे अधिकारी संजय कुमार (NCB officer Sanjay Kumar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानला कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज नव्हते, असे एनसीबीने म्हटलंय. या आरोपपत्रात एनसीबीने एनडीपीएस कायद्यातंर्गत (NDPS Act) एकूण 14 जणांवर ड्रग्ज सेवनाचा ठपका ठेवला आहे. तर उर्वरित 6 जणांवरील आरोप पुराव्यांअभावी मागे घेण्यात आलेत. एनसीबीने कॉर्डिलिया क्रुझवर धाड टाकली तेव्हा आर्यन खान, मोहक यांना वगळून आरोपी असणाऱ्या सर्व व्यक्तींकडे ड्रग्ज सापडले होते.

दरम्यान, जेव्हा हा तपास एसआयटी (SIT Committee of NCB) कमिटीकडे गेला, त्यावेळी आर्यन खान (Aryan Khan),
अविन साहू (Avin Sahu), गोपाळ आनंद (Gopal Anand), समीर सिघन (Sameer Sighan) आणि भास्कर अरोडा (Bhaskar Arora), मानव सिंघल (Manav Singhal).
या सहा जणांकडे कोणताही अमली पदार्थ सापडला नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात कोणतीही तक्रार केली जाणार नाही,
असं सांगत एनसीबीने (NCB) त्यांना क्लिनचिट दिली आहे. मात्र बाकी 14 जणांवर आज पहिलं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.

 

Web Title :- Clean Chit To Aryan Khan In Cordelia Cruise Drugs Case | aryan khan got clean chit from ncb in drugs party case in mumbai

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा