जेजुरी कडेपठार ट्रस्ट कर्मचारी संघटनेच्या वतीने स्वच्छता अभियान

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – काल हाती घेतलेल्या स्वच्छता अभियानामुळे कडेपठार मंदिर (जुना गड) परिसर स्वच्छ आणि चकाचक झाला. कडेपठार ट्रस्ट कर्मचारी संघटनेच्या वतीने साफसफाई करण्यात आली. जेजुरी कडेपठार पायथ्यापासून सकाळी ९ वाजता या अभियानाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी ट्रस्टचे सचिव सदानंद बाळकृष्ण बारभाई, कर्मचारी दीपक खोमणे, सुनील खोमणे, सचिन शेवाळे, किरण शेवाळे, धनंजय नाकडे, पूजारी सचिन सातभाई, दादा असावलीकर, कडेपठार रहिवासी मनोज मोहिते, पायथा रहिवासी गणेश गोडसे आणि सासवड मधून खास स्वच्छ ते साठी आलेले प्रल्हाद भैरवकर आणि इतर भाविक उपस्थित होते.

या साफसफाई दरम्यान संपूर्ण पायथा, पायरी मार्ग आणि दोन्ही बाजूची तसेच कडेपठार चा संपूर्ण ११ एकरचां परिसर स्वच्छ करण्यात आला. हा संपूर्ण कचरा ९० पोती गोळा करण्यात आला व त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. सदरचे मंदिर हे उंच डोंगरावर असल्याने वाऱ्याने कचरा सर्वत्र पसरत असतो. यासाठी ठोस उपयोजना करण्यात येईल, असे मत सचिव सदानंद बारभाई यांनी प्रकट केले. या कामाची प्रेरणा पुणे धर्मादाय सह आयुक्त देशमुख साहेब यांच्यामुळे मिळाली, असे त्यांनी सांगितले.

संपूर्ण गड स्वच्छ राहण्यासाठी वेळोवेळी मदतीस येऊ असे सासवडचे रहिवासी प्रल्हाद भैरवकर यांनी सांगितले. सर्वांनी केलेल्या मदतीसाठी ट्रस्टच्या वतीने बारभाई यांनी आभार व्यक्त केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/