पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा; संवर्ग निश्चितीसाठी महासंचालकाकडे प्रस्ताव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या पंधरा महिन्यांपासून बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्य पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांच्या बढीतीतील मुख्य अडसर दूर झाला असून, प्रस्तावाला मान्यता ( clear-way-promotion-police-officers) मिळाली आहे. तो प्रस्ताव अंतिम निश्चितीसाठी पोलीस मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. बढतीसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या पसंतीचा संवर्ग मागवण्यात येणार आहे. त्यानंतर गृह विभागाकडून बढतीचे आदेश काढले जातील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

तीन दशकांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांचे उपविभागीय अधिकारी, सहायक आयुक्तपदाची पदोन्नतीची फाईल गेल्या सव्वा वर्षापासून सामान्य प्रशासन विभागाकडे मान्यतेसाठी प्रलंबित होती. त्यानंतर त्या आता अधिकाऱ्यांनी प्रस्तावाला मंजुरी देऊन ताे गृह विभागाकडे पाठवला आहे. तेथून ताे तातडीने नियुक्तीसाठी संबंधित अधिकारी सध्या कार्यरत आहेत का, याची पडताळणी करून संवर्ग निश्चित करण्यासाठी महासंचालक कार्यालयाकडे पाठवला आहे.

रिक्त पदांपैकी 205 जागा भरणार
उपअधीक्षक, एसीपीची सध्या 295 पदे रिक्त असून, त्यापैकी 205 जागा भरण्यात येणार आहेत. 90 पदे सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकेला अधिन राहून राखीव ठेवली आहेत. मान्यता मिळालेल्यांपैकी निवृत्त, मृत झालेल्यांची नावे वगळून इतरांना बढती दिली जाणार आहे.

You might also like