‘त्या’ जि.प. महिला लिपिकाच्या खूनाचे गुढ उकलले, प्रेमसंबंधातून खून झाल्याचे उघड

गडचिरोली : पोलिसनामा ऑनलाईन – गडचिरोली येथील जिल्हा परिषदेत लिपिक असलेल्या युवतीच्या हत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. या युवतीची हत्या हि प्रेमसंबंधातून झाली असून या हत्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नामदेव दागोची भोगे असे या आरोपीचे नाव असून तो पेशाने शिक्षक आहे. गडचिरोलीमधील जिल्हा परिषद शाळेत तो शिक्षक आहे.

अविवाहित युवती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत लिपिक होती. तिचे नामदेव भोगो या आरोपी शिक्षकाबरोबर प्रेमसंबंध होते. आरोपी हा विवाहित असून त्याला एक मुलगा देखील आहे. मात्र अनेक दिवसांपासून त्यांच्यात वाद होत होता. त्यामुळे या वादाला कंटाळून त्याने अखेर तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याने अखेर १५ जुलै रोजी तिची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर १७ जुलै रोजी तिचा मृतदेह एका नाल्यात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. तिची गाडी देखील त्या नाल्याच्या किनारी आढळून आली होती.

दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा तपास करताना हि युवती काम करत असलेल्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज सुरुवातीला तपासले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला अटक केली. न्यायालयात सादर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –