जेव्हा अचानक बँकेनं महिलेच्या अकाऊंटमध्ये जमा केले 262 कोटी, करू लागली ‘प्लॅनिंग’

पोलीसनामा ऑनलाइन टीम : अमेरिकेतील टेक्सास येथून एक अजब घटना समोर आली आहे. एका बँकेने चुकून एका महिलेच्या खात्यात २६२ कोटी रुपये ट्रान्सफर झाले आहे. गेल्या आठवड्यात जेव्हा महिलेने आपले खाते तपासले तेव्हा ती स्तब्ध झाली. ३५ वर्षीय रूथ बॅलून बॅंकेच्या चुकीमुळे अब्जाधीश झाली.
जब अचानक बैंक ने महिला के अकाउंट में भेजे 262 करोड़, करने लगी प्लानिंग
खात्यात वाढलेली रक्कम पाहून महिलेने लेगसी टेक्सास बँकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु बँकेच्या ऑनलाइन चॅटमुळे तिला त्वरित संपर्क साधता आला नाही. कोणीतरी तिला ही रक्कम गिफ्ट केली आहे, असे तिला वाटू लागले.

जेव्हा महिलेने आपल्या पती ब्रीआनला घटनेबद्दल सांगितले, तेव्हा त्याला वाटले की, हा एखादा घोटाळा असेल. बँकेशी संपर्क साधला असता बँकेकडून चूक झाली असल्याचे आढळले. एका कर्मचार्‍याने ही रक्कम चुकीच्या अकाउंट नंबरवर हस्तांतरित केली असल्याचे बँकेने म्हटले आहे. या घटनेबद्दल बँकेने दिलगिरी व्यक्त केली आणि पैसे परत घेतले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/