भर रस्त्यात लिपीकाचा प्राध्यापकावर कोयत्याने हल्ला

श्रीरामपूर(यवतमाळ) : पोलीसनामा आॅनलाइन

भर रस्त्यात लिपीकाने प्राध्यापकावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (ता. 10) दुपारी घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्रा. डाॅ. अजय मधुकर गडम (वय 54, रा. मामा चाैक, पुसद) असे जखमी झालेल्या प्राध्यापकाचे नाव असून याप्रकरणी अभय गडम यांनी वसंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती, प्रा. डाॅ. अजय गडम हे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आपले कार्यालयीन काम आटोपून दुचाकीने घरी निघाले होते. यावेळी त्यांच्याच महाविद्यालयातील लिपिक रामराव मनोहर देशमुख ( वय, 50 रा. ग्रीनपार्क) याने प्राध्यापकाच्या डोके व हातावर हल्ला चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. प्राध्यापक आणि लिपीक यांच्यात चार दिवसांपूर्वीच टिळक महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राच्या मानधनावरुन वाद झाला होता. लिपिक रामराव याने प्राध्यापकाच्या डोक्यावर वार केले. मात्र, प्राध्यापकांनी ते हातावर झेलले. त्यानंतर प्रा. अजय गडम यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी संस्था व महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. आशीष देशमुख यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.

ठाणेदार रवींद्र भंडारे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आशीष इंगळे करीत आहेत.

[amazon_link asins=’B0778JFC13,B0757K3MSX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’92f7bb4c-b506-11e8-8ab6-5989a696d3e2′]