३० हजार रुपयांची लाच घेताना सह निबंधक कार्यालयातील लिपीक जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सोसायटीच्या दस्त नोंदणीसाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना धनकवडी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील लिपिकाला सापळा अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले.

गणेश मल्लिकार्जुन वैकुंठे (वय ३२, रा़ मोरया सोसायटी, बिबवेवाडी) असे या लिपिकाचे नाव आहे़.

तक्रारदार हे शालिनी मल्टि सर्व्हिसेस या नावाने सोसायटीची नोंदणी, अकाऊंटिंगची कामे करतात़. कात्रज येथील निसर्ग रेसिडेन्सी सोसायटीच्या नोंदणीचे काम तक्रारदार यांनी घेतले होते. त्या अनुषंगाने डीड ऑफ डिक्लरेशन दस्त नोंदणीसाठी तक्रारदार यांनी सह दुय्यम निबंधक कार्यालया हवेली नं ९ येथे गेले. त्यावेळी वैकुंठे यांच्याकडे सध्या सह दुय्यम निबंधक पदाचा पदभार आहे़. तक्रारदार यांना वैकुंठे यांनी दस्त नोंदणीसाठी ३० हजार रुपयांची लाच मागितली. परंतु तक्रारदार यांनी लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार केली. त्याची पडताळणी केल्यानंतर त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी धनकवडीतील दुय्यम निबंधक कार्यालयात सापळा रचून अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने तक्रारदाराकडून सायंकाळी सात वाजता ३० हजार रुपये घेताना पकडले़.

याप्रकरणी वैकुंठे यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्याचे काम सुरु आहे.

अशा प्रकारे लोकसेवकाने लाच मागितल्यास याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांनी केले आहे.

 

Loading...
You might also like