‘असा’ CLICK केला होता कियारा आडवाणीचा ‘TOPLESS’ फोटो !


पोलीसनामा ऑनलाईन :
बॉलिवूड स्टार कियारा आडवाणी काही दिवसांपूर्वी आपल्या न्यूड फोटोंशुटमुळं चर्चेत आली होती. डब्बू रतनानी कॅलेंडर 2020 साठी तिनं हे फोटोशुट केलं होतं. यावर अनेक मीम्स व्हायरल झाले होते. अशात एक फोटो समोर आला ज्यातून हा खुलासा झाला आहे की, हे फोटोशुट कसं झालं आहे. अनेकांना त्यांच्या प्रश्नांचे उत्तर मिळणार आहे. कारण हा फोटो कसा घेतला असावा असा प्रश्न बहुतेक लोकांना पडला होता.

डब्बू रतनानीनं त्याच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो कियाराच्या त्या न्यूड फोटशुट दरम्यानचा आहे. फोटो दिसत आहे की, कियारा पानांच्या मागे उभी आहे. तिच्या बाजूला डब्बू रतनानी दिसत आहे. जितकं हे फोटोशुट अवघड आहे त्याहून अधिक जास्त सेटवर मस्ती झालेली असावी. फोटोत डब्बू स्माईल करत आहे. तर कियारानंही वेगळेच एक्सप्रेशन दिले आहेत.

फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “Beleaf in yourself” एकीकडे कियाराच्या टॉपलेस फोटोची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे डब्बूचा कियारासोबतचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो डब्बूची वाईफ मनीषा रतनानीनं क्लिक केला आहे. अनेक चाहते यावर कमेंट करत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.