‘त्या’ला ‘मसाज’साठी हवी होती ‘कॉल’गर्ल, WhatsApp वरील लिंक ‘क्लिक’ करताच पत्नीचा फोटो सेक्स वर्कर म्हणून झाला ‘फ्लॅश’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऑनलाइन मसाज करण्यासाठी चौकशी करणे एका 30 वर्षीय ज्वेलरी डिझायनरला चांगलेच महागात पडले आहे. या तरुणाने मसाज करुन घेण्यासाठी कॉल गर्लची चौकशी केली. समोरच्या व्यक्तीने त्याच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने समोरच्या व्यक्तीने त्याच्या पत्नीचा फोटो एडीट करून सेक्स वर्कर म्हणून एका डेटिंग अ‍ॅपवर अपलोड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी तरुणाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पालघरमध्ये राहणारा हा तरुण नोकरीसाठी अंधेरी येथे जातो. या तरुणाने 14 डिसेंबर 2019 रोजी बॉडी मसाज चौकशीसाठी एका व्यक्तीला फोन केला. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने तरुणाला पाच महिलांचे फोटो पाठवून एका महिलेस निवडण्यास सांगितले. त्यानुसार त्याने एका महिलेची निवड करून तिला पालघर येथे पाठवण्यास सांगितले. समोरच्या व्यक्तीने 50 हजार रुपयांची मागणी केली. एवढे पैसे देणे शक्य नसल्याने तरुणाने पैसे देण्यास नकार दिला.

पैसे देण्यास नकार दिल्याने समोरच्या व्यक्तीने तरुणाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याच्या पत्नीचा फोटो घेतला. पत्नीचा फोटो एका पॉर्नस्टारच्या फोटोसोबत मॉर्फ करुन एका डेटिंग अ‍ॅपवर अपलोड केला. तसेच तरूणाच्या पत्नीचा सेक्स वर्कर असा उल्लेख केला. तरुणाने याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाला 16 डिसेंबरला व्हॉटस् अ‍ॅपवर एका डेटिंग अ‍ॅपची लिंक मिळाली. त्या लिंकद्वारे सेक्स वर्करच्या रॅकेटमध्ये पीडित तरुण अडकला. नंतर पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच्या पत्नीचा फोटो मॉर्फ करून तो डेटिंग अ‍ॅपवर टाकला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/