हवामानातील बदलामुळं देवीसारखे जुने ‘व्हायरस’ आयुष्यात परतण्याची दाट शक्यता, संशोधकांचा इशारा

पॅरिस : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असताना हवामानातील बदलामुळे डेंग्यु, झिकासारखे जुने-सुप्त व्हायरस पुन्हा आयुष्यात परतण्याचा युरोपला धोका असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. हे संकट जरी एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखे वाटत असले तरी, ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे व्हायरस, साथीचे रोग गंभीर बनत चालले आहेत. कोरोनाने जगावर संकट आणले आहे. यामुळे 7 लाख 60 हजारापेक्षा अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर दोन कोटी पेक्षा जास्त लोकांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. जंगलावर मानवाने अतिक्रमण केल्यामुळे हे सर्व घडत आहे, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. परिणामी कोरोनासारखीच अन्य मोठं संकट ओढावणार आहे.

देवी, शीतज्वरासारख्या विषाणूचा धोका
जगाच्या तापमानात एक डिग्री सेल्सिअसची वाढ झाली आहे. त्यामुळे हे तपामान वाढ मलेरिया डेंग्यू सारख्या रोगांचे वाहन बनले आहे. देवी, शीतज्वरासारखे उत्पात माजविलेले व्हायरस पुन्हा परतण्याचा धोका असल्याचे म्हटले आहे. स्वीडनच्या उमीया विद्यापीठाच्या मायक्रोबायोलॉजीच्या संशोधक बिर्गिट्टा इव्हनगार्ड यांनी सांगितले की, मानवाने त्यांची हद्द पार केली आहे. त्यामुळे आपले भविष्य कठीण दिसू लागले आहे. आपणच आपले शत्रू बनत चाललो आहोत.

या भागात हवामान बदलाचा परिणाम 
हवामान बदलाचा हा टाईम बॉम्ब रशिया, कॅनडा आणि अलास्काच्या भागात पसरु लागला आहे. कारण या भागात जेव्हा इंडस्ट्रीचा उगम झाला तेव्हापासून तिप्पट कार्बन उत्सर्जन झाले आहे. जर मानवी वस्तीने 2015 च्या पॅरिस करारानुसार तापमान दोन डिग्री सेल्सिअसने कमी केले तर हा ध्रुव प्रदेशातील उघडी पडलेली जमीन 2100 पर्यंत पुन्हा बर्फाच्छादीत होईल, असे युएनच्या हवामान पॅलनेलने म्हटले आहे.