Climate Change | NASA ची भविष्यवाणी ! 2030 मध्ये चंद्रावर होणार हालचाल आणि पृथ्वीवर येणार विनाशकारी पूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जलवायु परिवर्तनामुळे (Climate Change) पृथ्वीच्या अनेक भागात अचानक हवामान बदल होतात, ज्यामुळे अनेक देशात पूराची स्थिती उत्पन्न होते, विशेषता अमेरिकेत, परंतु आता एका संशोधनात म्हटले आहे की, हवामानातील बदलामुळे पृथ्वीचा शेजारी चंद्र (Moon) सुद्धा असू शकतो. हे संशोधन अमेरिकन स्पेस एजन्सी नॅशनल एयरोनॉटिक्स आणि स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (NASA) ने केले आहे, नासा सांगते की जलवायु परिवर्तनामुळे (Climate Change) वाढत्या समुद्र जलस्तरासह चंद्र आपल्या कक्षेत ’डगमगल्या’ने पृथ्वीवर (Earth) विनाशकारी पूर येईल. हे संशोधन क्लायमेट चेंजवर आधारित जर्नल नेजर मध्ये 21 जूनला प्रकाशित झाले आहे. Climate Change | nasa study predicts record flooding in 2030s due to moons wobble climate change rising sea levels

चंद्रामुळे उत्पन्न होणार्‍या पूराच्या स्थितीला संशोधनात ’उपद्रवी पूर’ म्हटले आहे.
अशाप्रकारचा पूर किनारी भागात येतो, जेव्हा समुद्राच्या लाटा रोजच्या सरासरी उंचीच्या तुलनेत 2 फुट उंच उसळतात.
अशा स्थिती व्यापारासाठी समस्या निर्माण करतात, जेव्हा घर आणि रस्ते पाण्यात बुडतात आणि रोजचे जीवन प्रभावित होते.

’एक दशकापर्यंत चालेल सत्र’

नासाच्या (NASA) संशोधनानुसार, पूराची ही स्थिती 2030 च्या मध्यावर जास्त होईल आणि अनियमित सुद्धा होईल.
संशोधनात म्हटले आहे की अमेरिकन किनारी भागात समुद्राच्या लाटा आपल्या सामान्य उंचीच्या तुलनेत तीन ते चार फुट ऊंच उसळतील आणि हे सत्र एक दशकापर्यंत जारी राहील.
संशोधनात हे सुद्धा म्हटले आहे की, पूराची ही स्थिती संपूर्ण वर्षात नियमितपणे राहणार नाही.
तर काही महिन्यांच्या दरम्यान ही पूर्ण स्थिती बनेल, ज्यामुळे तिचा धोका आणखी वाढेल.

’किनारी भागात वाढतील समस्या’

नासाचे प्रशासक बिल नेल्सन (Bill Nelson) यांनी म्हटले, समुद्राच्या वाढत्या जलस्तरामुळे खालच्या भागात धोका सतत वाढत आहे.
आणि वारंवार पूर आल्याने लोकांच्या समस्या वाढत आहेत आणि आगामी काळात आणखी वाढतील.
आपल्या कक्षेत चंद्राने जागा बदलल्याने गुरुत्व आकर्षण, वाढता समुद्र जलस्तर आणि क्लायमेट चेंज एकाचवेळी मिळून जागतिक स्तरावर किनारी भागात पूराची स्थिती निर्माण करतील.

आपल्या कक्षेत जागा बदलेल चंद्र

पृथ्वीवर पूरासाठी चंद्राचा प्रभाव समजावताना युनिव्हर्सिटी ऑफ हवाईमध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि संशोधनाचे मुख्य लेखक फिल थॉम्पसन (Phil Thompson) यांनी म्हटले, चंद्र जेव्हा आपल्या कक्षेत ’डगमगतो’, तेव्हा यास पूर्ण होण्यास 18.6 वर्षाचा काळा लागतो.
पृथ्वीवर वाढत्या उष्णतेमुळे वाढत्या समुद्र जलस्तरासह मिळून हा आणखी धोकादायक होतो.

कसा होईल चंद्राचा परिणाम

थॉम्पसन यांनी म्हटले, 18.6 वर्षात अर्ध्या काळापर्यंत म्हणजे सुमारे 9 वर्षापर्यंत पृथ्वीवर समुद्रात सामान्य भरती येणे कमी होते.
हाय टाईडची उंची सामान्यपणे कमी असते, लो टाईडची उंची सामान्यपणे जास्त असते.
तर पुढील 9 वर्षापर्यंत याच्या उलट परिणाम होतो. पुढील्या वेळी हे चक्र 2030 च्या जवळपास होईल.
ज्यामुळे सामान्य जीवनावर खुप परिणाम होईल, विशेषता किनारी भागात.

Web Title : Climate Change | nasa study predicts record flooding in 2030s due to moons wobble climate change rising sea levels

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Former Cricketer Yashpal Sharma | माजी क्रिकेटर यशपाल शर्मा यांचं निधन, 1983 च्या विश्वचषक स्पर्धेत बजावली होती मोलाची कामगिरी

Chandrapur Crime News | जनरेटरच्या धुरामुळे गुदमरुन 6 जणांचा मृत्यु

Pune Crime | ज्योतिषाचार्य रघुनाथ येमूलच्या अडचणीत आणखी वाढ; पुणे पोलिसांनी उचलले ‘हे’ पाऊल