Climber Narayanan Iyer And Pradnya Sawant Dies | पुण्याचे गिर्यारोहक नारायणन अय्यर, मुंबईच्या ट्रेकर प्रज्ञा सावंत यांचा मृत्यु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Climber Narayanan Iyer And Pradnya Sawant Dies | जगातील तिसर्‍या क्रमांकाचे उंच शिखर (8586 मीटर) असलेल्या कांचनजुंगा (Mount Kanchenjunga) वर चढाई करण्याच्या प्रयत्नात असताना निर्जलीकरणाने (डिहायड्रेशन -Dehydration)  पुण्यातील गिर्यारोहक नारायणन अय्यर (Climber Narayanan Iyer)  (वय 52) यांचा मृत्यु झाला. तर, दुसर्‍या एका मोहिमेत गोक्या (Gokya) येथे एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक (Everest Base Camp Trek) रुटवर मुंबईतील ट्रेकर डॉ. प्रज्ञा सावंत (Dr. Pragya Sawant) यांचा शुक्रवारी मृत्यु झाला. या दोन घटनांमुळे महाराष्ट्रातील गिर्यारोहन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

 

कॅम्प 4 सोडल्यानंतर काही वेळातच नारायणन अय्यर यांना अस्वस्थ वाटू लागले. तेव्हा त्यांना गिर्यारोहक मार्गदर्शकाने वारंवार खाली उतरण्यास सांगितले. पण अय्यर यांनी त्यांच्या आवाहनाला नकार दिला त्यांनी शिखर गाठण्याचा निर्धार केला. शिखर बिंदूकडे जाताना 8 हजार 200 मीटरवर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिखर सर केलेले इतर गिर्यारोहक परतीच्या मार्गावर आहेत.

 

दुसर्‍या घटनेत मुंबईतील ट्रेकर डॉ. प्रज्ञा सावंत यांचा एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेकवर मृत्यु झाला. सावंत यांच्या मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

 

Web Title :- Climber Narayanan Iyer And Pradnya Sawant Dies | Dr pradnya sawant and narayan ayyar trekker from mumbai on everest base camp trek route death

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

Advt.

हे देखील वाचा