छगन भुजबळ यांच्या निकटवर्तीयाची गणपती मंदिरात आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय मानले जाणारे, चित्रपट निर्माते सदानंद उर्फ पप्पू लाड यांनी आज सकाळी ‘लाडाचा गणपती’ मंदिरात आत्महत्या केली. आज सकाळी मंदिर उघडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट आहे.

सदानंद लाड यांनीच या मंदिराची निर्मिती केली होती. मंदिर निर्मितीनंतर लाड प्रसिद्धीच्या झोतात आले होते. लाड हे चित्रपट निर्माते म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी १५ हून अधिक मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे.

लाड यांनी मराठी आणि काही भोजपुरी चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटांपैकी देहांत, श्श्श… तो आलाय, कुंभारवाडा डोंगरी, माझ्या नवऱ्याची गर्लफ्रेण्ड या चित्रपटांची चर्चाही झाली. मात्र, सगळेच चित्रपट विशेष काही गाजले नाही.

पप्पू लाड यांनी निर्मिती केलेला ‘देहांत’ हा चित्रपट विशेष गाजला. या चित्रपटाचं लेखन प्रदीप म्हापसेकर यांनी केले होते, तर प्रसिद्ध अभिनेते अशोक शिंदे यांनी या चित्रपटात काम केले होते.

प्रत्येक चित्रपटाचा पहिला सीन ग्रँड रोड येथील त्यांनी बांधलेल्या लाडाच्या गणपती मंदिरातीलच असावा, असा पप्पू लाड यांचा आग्रह असायचा. बूट पॉलिश ते चित्रपट निर्माता असा त्यांचा प्रवास होता.

सदानंद लाड यांनी निर्मिती केलेल चित्रपट :

देहांत
कुंभारवाडा डोंगरी
श्श्श… तो आलाय
लाडाची चिंगी
माझ्या नवऱ्याची गर्लफ्रेण्ड
एक कटिंग चाय बाय 2
धुर्पी
स्वामी
झिंगाट
इस्कट
मोहब्बत की जंग
दगाबाज पंडित
जब जब खून पुकारे.
दरम्यान या आत्महत्येचं कारण काय याचा शोध पोलीस घेत असून , कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.