शिवेंद्रराजेंनी भाजपात प्रवेश केल्यानंतर शरद पवार – कल्पनाराजेंमध्ये तासभर चर्चा

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर सायंकाळी शरद पवार यांनी कल्पनाराजे भोसले यांची भेट घतली. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. यावेळी तिंघांमध्ये एक तास बंद खोलीमध्ये चर्चा झाली. बुधवारी सकाळी शिवेंद्रराजे यांनी भाजपात प्रवेश केला. काल शरद पवार वाटेगावला जाताना साताऱ्यात थांबले. त्यांनी शासकीय विश्रामगृहात राजमाता कल्पनाराजे यांची भेट घेतली.

आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमीत्त आज (गुरुवार) सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवार जात होते. त्यावेळी सायंकाळी सहाच्या सुमारास साताऱ्यात थांबले. शासकीय विश्रामगृहात त्यांचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी स्वागत केले. या ठिकाणी त्यांनी उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्यासोबत तासभर बंद खोलीत चर्चा केली.

बंद खोलीत झालेल्या चर्चेच्या वेळी सुनिल तटकरे उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठीची रणनिती आखण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.

साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजपा प्रवेशाने सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. काल शरद पवार यांनी राजमाता कल्पनाराजे भोसले यांची भेट घेतली. त्यांच्या झालेल्या भेटीला राजकीय महत्व प्राप्त झाले झाले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –