महाराष्ट्र बंद मुळे शहरात कडकडीत बंद

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा आरक्षणला पाठिंबा देण्यासाठी आज क्रांती दिनी सकल मराठा मोर्च्याच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे आज सकाळ पासून शहरातील मुख्य बाजारपेठेसह गल्लीतील दुकाने व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद ठेवून सहकार्य दाखवत आहेत. चाकण येथे आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने झालेली परिस्थिती पाहता आज कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील कंपन्या, शाळा, महाविद्यालये, पेट्रोल पंप, हॉटेल्स बंद ठेवण्यात आली आहेत. सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या असून प्रत्येकाला हद्दीत फिक्स पॉईंट दिले आहेत. महामार्ग, द्रुतगती महामार्ग, मुख्य चौक या ठिकाणी पोलीस खडा पहारा देत आहेत. स्थानिक पोलिसांसोबत गुन्हे शाखेचे पोलिसही कार्यरत आहेत. दंगा काबू नियंत्रण पथक, राज्य राखीव दलाची तुकडी, क्यूक अकॅशन रिस्पॉन्स टीम यासारखी पथके बोलवण्यात आलेली आहेत.

[amazon_link asins=’B07FBMMW5P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’70d4bed5-9b8b-11e8-942b-856e6360b3d3′]

चाकण परिसरात पुकारलेल्या दुपारच्या सुमारास हिसक वळण लागले. संतप्त जमावाने शोकडो वाहनांची तोडफोड केली तर २५ ते ३० वाहने पेटवून दिली. यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी व प्रवाशी नागिरकही जखमी झाले. तबबल सात तासानंतर चाकणमधील तणावाची परिस्थिती हळू हळू निवळली. चाकण परिसरात संचारबंदी लावण्यात आली होती. कोल्हापुर परिक्षेत्र विभागाचे  विशेष पोलिस महानिरीक्षक  विश्वास नांगरे पाटील  यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी चाकण परिसरात दाखल झाले होते. पोलिसांनी या प्रकरणात सुमारे ५००० आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

चाकण मध्ये झालेली घटना, परिस्थिती पाहता पोलिसांनी आगोदरच मोठा पोलीस फोर्स रस्त्यावर उतरवला आहे. संशयित असणाऱ्यांना ताब्यात घेतले जात आहे. तसेच पोलिसांची वेगवेगळी पथके परिसरात गस्त घालून सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.