अलंकार टॉकीज चौक ते जहांगीर चौक रस्ता वाहतुकीसाठी बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

 

अलंकार चौक ते जहांगीर चौका दरम्यान रेल्वे ओव्हर ब्रीजचे काम करण्यात येणार असल्याने हा रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार आहे. या ओव्हर ब्रीजचे काम २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत होणार असून या कालावधीमध्ये हा रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.
[amazon_link asins=’B077L4X3PN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0c91d364-a87a-11e8-a1f3-7f443dd611ac’]

रेल्वे ओव्हर ब्रीजचे काम सुरु होणार असल्याने अलंकार चौक ते जहांगीर चौक या दरम्यान वाहतूक कोंडी होवू शकते. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतुक सुरळीत चालण्यासाठी वाहन चालकांनी पर्य़ायी रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. हा रस्ता २८ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते १ सप्टेंबर दुपारी तीन पर्य़ंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

अलंकार चौकातून जहांगीर चौकात येणाऱ्या वाहनांनी अलंकार चौक – आय. बी. चौक – मंगलदास चौक या मार्गाचा वापर करुन वाहतूक पोलिसांना सहकार्य़ करावे असे आवाहन पुणे वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

इतर बातम्या-
जुन्याच सायकल ‘शेरिंग’ सेवेचे पालकमंत्री गिरिष बापट यांच्या हस्ते नव्याने उदघाटन